VIDEO : पंत इज बॅक! टीका करणाऱ्यांबद्दल प्रश्न विचारताच दिलेलं उत्तर पाहाच

VIDEO : पंत इज बॅक! टीका करणाऱ्यांबद्दल प्रश्न विचारताच दिलेलं उत्तर पाहाच

विंडिजविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात पंतने श्रेयस अय्यरसोबत शतकी भागिदारी करून संघाचा डाव सावरला. यासह त्याने एकदिवसीय क्रिकेट कारकिर्दीत पहिलं अर्धशतकही केलं.

  • Share this:

चेन्नई, 16 डिसेंबर : भारताचा युवा फलंदाज आणि यष्टीरक्षक ऋषभ पंत एकदिवसीय वर्ल्ड कपपासून संघात सातत्याने खेळत आहे. यापुढे यष्टीरक्षणाची जबाबदारी त्याच्याच खांद्यावर असल्याचं निवड समितीने आधीच स्पष्ट केलं आहे. मात्र, त्याच्याकडून फलंदाजीत म्हणावी तशी कामगिरी होत नव्हती त्यावरून पंतवर चौफेर टीका होत होती. विंडिजविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात पंतने श्रेयस अय्यरसोबत शतकी भागिदारी करून संघाचा डाव सावरला. यासह त्याने एकदिवसीय क्रिकेट कारकिर्दीत पहिलं अर्धशतकही केलं.

पहिल्या अर्धशतकानंर ऋषभ पंत म्हणाला की, भारतासाठी खेळलेली प्रत्येक खेळी महत्वाची असते. त्याप्रमाणे ही खेळीसुद्धा खास अशीच होती. जेव्हा मी आणि श्रेयस फलंदाजी करत होतो तेव्हा भागिदारी 35 ते 40 षटकांपर्यंत कशी करता येईल हे लक्ष्य होतं. त्यानंतर फटकेबाजी करायची असं ठरलं होतं. जे सामन्यातील परिस्थितीत महत्त्वाचं होतं.

खेळातील बदलाबाबत विचारले असता पंत म्हणाला की, सुरुवातीपासून आक्रमक खेळायला पाहिजे असं ऐकलं होतं. पण जेव्हापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळायला लागलो तेव्हा एक गोष्ट शिकायला मिळाली की नैसर्गिक खेळ असं काही नसतं तुम्हाला संघाच्या गरजेनुसार खेळावं लागतं.

फलंदाजीवरून टीका करणाऱ्यांना उत्तर देताना पंतने म्हटलं की, चौफेर ज्या काही चांगल्या वाइट चर्चा होत आहेत त्यावर मी लक्ष देणार नाही. जेवढं होऊ शकेल तेवढं खेळाकडे लक्ष केंद्रीत करायचे आहे.

भारताने दिलेलं 288 धावांचं आव्हान शेमरॉन हेटमायर आणि शाय होप यांच्या शतकांच्या जोरावर विंडीजने सहज पेललं. हेटमायरने 139 धावांची तर शाय होपने नाबाद 102 धावांची खेळी केली. भारताच्या गोलंदाजीचा हेटमायर आणि शाय होपने समाचार घेतला. दोघांनी दुसऱ्या गड्यासाठी 218 धावांची भागिदारी केली.

तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना भारताने श्रेयस अय्यर-ऋषभ पंत आणि जडेजा-केदार जाधव यांच्या खेळीच्या जोरावर 287 धावा उभारल्या. भारताच्या डावाची सुरुवात अडखळत झाली. शेल्डन कॉट्रेलनं दोन गडी बाद करून भारताच्या फलंदाजीला खिंडार पाडलं. पण त्यानंतर भारतीय फलंजाजांनी सावध खेळ करत डाव सावरला.

भारताचा सलामीवीर रोहित शर्मा 36 धावांवर बाद झाला. त्याच्याआधी केएल राहुल आणि विराट कोहली लवकर बाद झाले. रोहित शर्मानंतर ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यर यांनी डाव सावरला. दोघांनी 114 धावांची भागिदारी केली. ऋषभ पंत 71 तर श्रेयस अय्यर 70 धावांवर बाद झाला. त्यानंतर केदार जाधव आणि रविंद्र जडेजा यांनी अर्धशतकी भागिदारी करत संघाच्या धावसंख्येत भर घातली. विंडीजकडून शेल्डन कॉट्रेल, किमो पॉल आणि अल्झारी जोसेफ यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले तर पोलार्डने एक गडी बाद केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 16, 2019 01:46 PM IST

ताज्या बातम्या