मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /Ind vs Pak: अरे... हे तर करतायत चक्क धोनीची कॉपी! भारतीय खेळाडूंकडून हेलिकॉप्टर शॉटची प्रॅक्टिस

Ind vs Pak: अरे... हे तर करतायत चक्क धोनीची कॉपी! भारतीय खेळाडूंकडून हेलिकॉप्टर शॉटची प्रॅक्टिस

रिषभ पंत, रवींद्र जाडेजा सराव करताना

रिषभ पंत, रवींद्र जाडेजा सराव करताना

Ind vs Pak: रिषभ पंत आणि रवींद्र जाडेजा या दोघांचा सरावाचा व्हिडीओ बीसीसीआयनं नुकताच शेअर केला आहे. त्यात पंत आणि जाडेजा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा फेव्हरेट हेलिकॉप्टर शॉट खेळताना दिसत आहेत. टीम इंडियाच्या मधल्या फळीत या दोघांकडून आशिया चषकात चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.

पुढे वाचा ...
  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

दुबई, 26 ऑगस्ट: टीम इंडियाचं मिशन आशिया चषक सुरु होतंय येत्या रविवारपासून. आशिया चषकात भारताची सलामीला गाठ पडणार आहे ती पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी. क्रिकेटविश्वातला सर्वात उत्कंठावर्धक सामना कोणता असेल तर तो आहे भारत आणि पाकिस्तान या संघांमधला सामना. येत्या रविवारी दुबईच्या मैदानात हा महामुकाबला रंगणार आहे. आणि त्यासाठी भारतीय संघाचा दुबईत कसून सराव सुरु आहे. पण टीम इंडियाचे दोन खेळाडू नेट्समध्ये जरा जास्तच घाम गाळतायत. आणि ते चक्क माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची कॉपी करतायत.

पंत, जाडेजाचा हेलिकॉप्टर शॉट

हे दोघे आहेत रिषभ पंत आणि अष्टपैलू रवींद्र जाडेजा. या दोघांचा सरावाचा व्हिडीओ बीसीसीआयनं नुकताच शेअर केला आहे. त्यात पंत आणि जाडेजा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा फेव्हरेट हेलिकॉप्टर शॉट खेळताना दिसतायत. हेलिकॉप्टर शॉट ही महेंद्रसिंग धोनीची खासियत आहे. क्रिकेटच्या मैदानात अनेकदा त्यानं आपल्या भात्यातल्या खास फटक्यावर बॉल बाऊंड्रीच्या पार धाडलाय. त्यामुळे याच शॉटवर दुबईतल्या मैदानात षटकार ठोकण्यासाठी पंत आणि जडेजा सज्ज झाले आहेत. सरावादरम्यान इतर फटक्यांसह त्या दोघांनी हेलिकॉप्टर शॉटचाही सराव केला. महत्वाचं म्हणजे टीम इंडियाच्या मधल्या फळीत या दोघांकडून आशिया चषकात चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.

हेही वाचा - राष्ट्रकुल पदकविजेत्यांसाठी गुड न्यूज! बक्षिस रकमेत राज्य सरकारकडून घसघशीत वाढ

रोहित-विराट सज्ज

दरम्यान कालच्या सराव सत्रात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि धडाकेबाज फलंदाज विराट कोहलीनंही नेट्समध्ये कसून सराव केला. पाकिस्तानविरुद्धच्या महत्वाच्या लढतीत या दोघांवरच प्रामुख्यानं भारतीय संघाची मदार राहिल. दरम्यान उभय संघातल्या या सामन्याची आता सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे. कारण दहा महिन्यांनी क्रिकेटच्या मैदानातले हे पारंपरिक प्रतिस्पर्धी पुन्हा एकदा आमनेसामने येत आहेत. त्यात भारताला याआधीच्या विश्वचषकाच्या सामन्यात पाकिस्तानकडून पराभव स्वीकारावा लागला होता. त्या पराभवाचा वचपा टीम इंडिया काढणार का? याचं उत्तर येत्या रविवारी मिळेल.

First published:

Tags: Asia cup, Cricket, Sports, T20 cricket