ऋषभ पंत टीका करणाऱ्यांवर भडकला, धोनीशी तुलनेबद्दल म्हणाला...

ऋषभ पंत टीका करणाऱ्यांवर भडकला, धोनीशी तुलनेबद्दल म्हणाला...

पंत म्हणाला की, मला काहीही फुकट मिळालेलं नाही किंवा कोणी बक्षीस म्हणून दिलं नाही

  • Share this:

मुंबई, 07 सप्टेंबर : भारताचा युवा क्रिकेटपटू ऋषभ पंत सध्या संघात यष्टीरक्षक म्हणून खेळत आहे. विंडीज दौऱ्यापासून त्याच्यावर यष्टीरक्षणाची जबाबदारी असेल असं निवड समितीनं यापूर्वीच स्पष्ट केलं आहे. त्यानंतर भारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनीसोबत त्याची तुलना होऊ लागली. धोनीसोबत होत असलेल्या तुलनेबद्दल पंत म्हणाला की, त्याच्याशी कोणतीही स्पर्धा करण्यापेक्षा मी त्याच्याकडून शिकण्याचा प्रयत्न करत आहे.

बॉम्बे टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत धोनीसोबत तुलनेबद्दल मी विचार करत नाही. ते खूप कठीण आहे. जर मी त्याच्याकडून शिकत असून एका रात्रीत त्याच्यासोबत शिकण्याचा विचार नाही करू शकत नाही. मी त्याला माझा मार्गदर्शक मानतो. मला धोनीनं खूप साऱ्या गोष्टी शिकवल्या आहेत. फलंदाजी करताना आणि मैदानात असताना दबावाच्यावेळी शांत राहणं त्याच्याकडून शिकलो असं ऋषभ पंत म्हणाला.

पंत म्हणाला की, 21 व्या वर्षी जर मी धोनीची जागा घ्यायची आहे हा विचार करू लागलो तर माझ्यासाठी हे कठीण होईल. मी सर्व सोपं करायचा विचार करत आहे. माझ्या ताकदीनुसार सर्वोत्तम खेळायचं आहे. माझ्यापेक्षा अनुभवी, वरिष्ठ खेळाडू्ंकडून शिकायचं आहे.

हरभजनने सुचवला चौथ्या क्रमांकासाठी हा खेळाडू; फिरकी घेत युवराज म्हणाला, भावा...

विंडीज दौऱ्यावर पंतला फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. त्यामुळं त्याच्यावर टीका केली जात आहे. यावर पंत म्हणाला की, एका खेळाडूसाठी लवकर संधी मिळणं चांगली गोष्ट आहे. पण मला हे काही फुकटात मिळालेलं नाही. यासाठी मेहनत करून संघात जागा मिळवली आहे. कोणीही बक्षीस म्हणून दिलेलं नाही. जर तुम्ही चांगली कामगिरी केली नाही तर तुमची निवड होत नाही. सर्वांना स्वत:ला सिद्ध करावं लागतं असं पंत म्हणाला.

कार्तिकची कारकिर्द धोक्यात, त्या चुकीमुळे BCCI ने पाठवली नोटीस

चंद्रयान मोहिमेचं कवी कसं वर्णन करतील, पाहा UNCUT पंतप्रधान मोदींचं भाषण

Published by: Suraj Yadav
First published: September 7, 2019, 4:19 PM IST
Tags: cricket

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading