मी काय तबला वाजवण्यासाठी आहे का? टीकाकारांवर रवी शास्त्री भडकले

मी काय तबला वाजवण्यासाठी आहे का? टीकाकारांवर रवी शास्त्री भडकले

ऋषभ पंतचा बचाव करण्यासाठी धावून आले शास्त्री गुरुजी.

  • Share this:

नवी दिल्ली, 26 सप्टेंबर : भारताचा विकेटकिपर फलंदाज ऋषभ पंत आपल्या करिअरच्या खराब फॉर्ममध्ये सध्या आहे. वर्ल्ड कपमध्ये शिखर धवन जखमी झाल्यानंतर त्याला संघात स्थान मिळाले मात्र त्यानंतरही पंतला चांगली फलंदाजी करता आली नाही. वर्ल्ड कपनंतर खेळवण्यात आलेली वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका विरोधातल्या मालिकेतही सपशेल अपयशी झाला. त्यामुळं आजी-माजी सर्वच खेळाडू पंतवर टीका करत आहेत. एवढेच नाही तर टीम मॅनेजमेंटनं ऋषभ पंतला धमकी देत, दबाव टाकण्याचा प्रयत्न केला होता.

दरम्यान, या सगळ्यात भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक ऋषभ पंत त्याच्या मदतीसाठी धावून आले आहेत. हिंदुस्थान टाईम्स दिलेल्या मुलाखतीत, “टीम मॅनेजमेंट आणि संपूर्ण संघ पंतसोबत आहे. त्याला पुन्हा फॉर्ममध्ये आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करू”, असे सांगितले.

ऋषभ पंत मॅटविनर फलंदाज

पंतबाबत विचारलेल्या प्रश्नावर रवी शास्त्री यांनी, “पंत वेगळा खेळाडू आहे. पंत हा जगातला सर्वोत्तम फलंदाज आणि आक्रमक मॅचविनर खेळाडू आहे. सध्याच्या काळात असे खेळाडू फार कमी आहे, जे संघाला सामने जिंकून देतील. पंतवर टीका करणाऱ्यांचे ते काम आहे, पण मी सांगते पंत सध्या योग्य स्थितीमध्ये आहे. तो विशेष खेळाडू आहे. तो शिकत आहे, आणि संघ व्यवस्थापन त्याच्यासोबत आहे”, असे सांगितले. दरम्यान पंतवर टीका करणाऱ्यांवर भडकत शास्त्रींनी मी इकडे तबला वाजवण्यासाठी नाही आलो आहे”, असे उत्तर दिले.

वाचा-पंतमुळे धोनीच्या निवृत्तीला होतोय उशीर, वाचा INSIDE STORY

युवराजनं घेतली पंतजी बाजू

युवराज सिंगनं विकेटकिपर फलंदाज ऋषभ पंतचा बचाव केला आहे. युवराजनं नुकत्याच एका कार्यक्रमात पंतची बाजू घेत, “धोनी एका दिवसात स्टार खेळाडू झाला नाही, त्यामुळे पंतवर टीका करू नको”, असे सांगितले. युवराजनं यावेळी, “पंतला फॉर्ममध्ये यायचे असेल तर त्याला कर्णधार विराट कोहलीची मदत घ्यावी लागेल. भारतीय निवड समिती पंतला वर्ल्ड कपपासून संधी देत आहे. त्यामुळं पंतला खरी गरज मैदानावर टिकण्याची आहे”, असे सांगितले. युवी ‘द स्पोर्ट्स मुव्हमेंट’ या कार्यक्रमात बोलत होता.

वाचा-धोनी तर दूरच पंतही नाही, टी20 वर्ल्ड कपमध्ये खेळणार कोण?

गंभीरनं केली निवड समितीवर टीका

युवीच्याआधी भारतीय संघाचा माजी फलंदाज गौतम गंभीरनं पंतची शाळा घेतल्याबद्दल निवड समितीवर टीका केली आहे. गंभीरनं टाईम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्रात लिहिलेल्या लेखात “निवड समितीनं पंतसाठी बेजबाबदार, निष्काळजी असे शब्द वापरले नाही पाहिजेत. त्यामुळं पंत धावांसाठी नाही तर संघात आपली जागा मिळवण्यासाठी फलंदाजी करताना दिसत आहे. त्यामुळं तो बाद होत आहे”, असे लिहिले आहे. तसेच, कोणत्याही युवा खेळाडूला सांभाळून घेण्याची ही पध्दत नाही असेही गंभीरनं आपल्या लेखात लिहिले आहे. पंतला चौथ्या क्रमांकावर फलंदाज जमेत नसेल तर त्याला पाचव्या क्रमांकावर पाठवून पाहा, असा सल्लाही गंभीरनं दिला.

वाचा-‘धोनी एका दिवसात मोठा झाला नाही, मग पंतवर टीका का?’

टी-20 वर्ल्ड कपमध्ये खेळू शकले का पंत?

पंतवर होणारी टीका विचारात घेता. तसेच रवी शास्त्री आणि विक्रम राठोड यांनी त्याला दिलेला इशारा पाहता आगामी टी-20 वर्ल्डकपमध्ये संघात जागा मिळवणे पंतसाठी अवघड होत चालले आहे. आक्रमक क्रिकेट आणि बेजबाबदार क्रिकेट यात फरक असतो, अशा शब्दात राठोड यांनी पंतला समज दिली होती. सध्या अशीही चर्चा सुरु आहे की, धोनीने निवृत्ती जाहीर न करण्याचे एक मुख्य कारण त्याला योग्य असा पर्याय मिळालेला नाही.

वाचा-प्लीज मला ओपनिंगला पाठवा, सचिननं सांगितली 25 वर्षांपूर्वीची UNTOLD STORY

पुणे: पाण्यात अडकलेल्या चिमुकल्याच्या रेस्क्यू ऑपरेशनचा थरारक VIDEO

First published: September 26, 2019, 2:57 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading