पंतचा DRS हट्ट, रोहितनं कपाळावर मारला हात; पाहा VIDEO

पंतचा DRS हट्ट, रोहितनं कपाळावर मारला हात; पाहा VIDEO

एकाच षटकात पंतने इतक्या चुका केल्या की रोहित शर्माने अखेर कपाळावरच हात मारून घेतला. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 04 नोव्हेंबर : भारत बांगलादेश यांच्यातील पहिल्या टी20 सामन्यात यष्टीरक्षक ऋषभ पंतने एकाच षटकात तीन चुका केल्या. फक्त डीआरएस नव्हे तर चेंडू पकडण्यातही तो अपयशी ठरला. दोन चेंडूवर भारताला बांगलादेशचा गडी बाद करण्याची संधी होती. पण पंतच्या चुंकामुळे ती गमवावी लागली.

यष्टीमागे झेलचं अपील केल्यानंतर डीआरएस घेण्याच्या पंतच्या हट्टापुढे रोहितलाही हसावं की रडावं झालं. ही चूक भारताला महागात पडली. मुश्फिकुर रहीमने सामन्यात अर्धशतक केलं आणि सामनाही बांगलादेशला जिंकून दिला. पंतच्या चुकांमुळे सर्वांनाच धोनीची आठवण झाली. डीआरएसला धोनी रिव्हू सिस्टीम असंही सोशल मीडियावर म्हटलं जातं.

बांगलादेशच्या डावातील 10 वं षटक युझवेंद्र चहलने टाकलं. त्याने आधीच्या षटकात एक विकेट घेतली होती. 10 व्या षटकात पहिल्या दोन चेंडूवर एकही धाव दिली नाही. त्यानंतर पुढच्या चेंडूवर पंतकडे मुश्फिकुर रहीमला धावबाद करण्याची संधी होती. मात्र पंतला अचूक थ्रो मारता आला नाही आणि रहीमला जीवदान मिळालं.

पुन्हा तिसऱ्या चेंडूवर मुश्फिकर रहीमच्या पॅडवर चेंडू आदळला. तेव्हा चहल आणि पंतने पायचितचं अपिल केलं पण पंचांनी ते फेटाळलं. त्यावेळी भारताने डीआरएस घेतला नाही. टीव्ही रिप्लेमध्येही चेंडू स्टम्पवर आदळत असल्याचं दिसत होतं.

चहलच्या षटकातील शेवटच्या चेंडूवर पंतने झेल घेतल्याचं अपील केलं. चेंडू बॅटला लागून गेल्याचं म्हणत पंतने डीआरएस घेण्यासाठी रोहितला सांगितलं. त्यानंतर रोहितने पंतला तुला खात्री आहे का असं वारंवार विचारलं आणि डीआरएस घेतला.

रोहित शर्माने पंतच्या म्हणण्यावर डीआरएस घेतला पण चेंडू बॅटपासून दूर असल्याचं रिव्ह्यूमध्ये दिसलं. त्यामुळे भारताला विकेट तर मिळाली नाहीच पण रिव्हूसुद्धा गमवावा लागला. त्यावेळी रोहित शर्माला हसू आवरलं नाही. तर दुसरीकडे पंतने कपाळावर हात मारून घेत तोंड लपवलं.

VIDEO : आता म्हणताय येऊ का? अजित पवारांनी कार्यकर्त्यांना बजावलं

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 4, 2019 11:01 AM IST

ताज्या बातम्या