IPL 2019 : 'हा' दिग्गज खेळाडू मानतो रिषभ पंतला आपला गुरू, पाहा VIDEO

IPL 2019 : 'हा' दिग्गज खेळाडू मानतो रिषभ पंतला आपला गुरू, पाहा VIDEO

क्रिकेटचे मैदान गाजवणारा रिषभ पंत सध्या स्वत: गुरू झाला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 29 मार्च : भारतीय संघात धोनीची जागा चालवणारा युवा फलंदाज रिषभ पंत सध्या आयपीएल गाजवत आहे. मुंबई इंडियन्स विरोधात रिषभनं केलेल्या 78 धावांच्या खेळीनं त्यानं अनेक दिग्गज खेळाडूंचे मन जिकले. म्हणून सध्या रिषभ सध्या इतर खेळाडूंना क्रिकेटचे धडे देत आहे. अशाच एका ऑलिंपियन खेळाडूला क्रिकेट शिकवण्याचा ध्यास सध्या रिषभनं घेतला आहे. तो खेळाडू आहे, दिग्गज जलतरणपटू , ऑलिम्पिक विजेता मायकल फेल्प्स.

नुकतीच रिषभनं दिग्गज ऑलिंपियन मायकल फेल्प्सची भेट घेतली. यावेळी त्याने या महान जलतरणपटूला क्रिकेटमधील बारकावेदेखील सांगितले. पत्रकारांशी बोलताना फेल्प्सनं, ''मला स्वीमिंगनंतर क्रिकेट खेळायला आवडेल. गोल्फ आणि बास्केटबॉल हे माझे आवडते खेळ आहेत. मला रिषभनं शिकवलं तरी मी नक्की क्रिकेट खेळेन'', असे सांगितले. तर, रिषभनं, ''फेल्प्स चांगल्या शिष्य आहे. तो माझ्या घरी राहिला तर मी नक्कीच त्याला चांगला क्रिकेटर करेन'', असे सांगितले.

फेल्प्सने ऑलिम्पिकमध्ये जलतरणाच्या विविध प्रकारात २००४ ते २०१६ या कालावधीत तब्बल २८ पदके जिंकली. त्यातील २३ सुवर्णपदके होती. फेल्प्स काही दिवसांसाठी भारतात आला आहे. दिल्ली विरुद्ध चेन्नईचा सामनाही फेल्प्सनं मैदानात पाहिला होता. यावेळी दिल्लीला सपोर्ट करताना फेल्प्स दिसला. त्यानंतर नुकतेच, दिल्ली कॅपिटल्सच्या सरावादरम्यान मायकल फेल्प्सनं खेळाडूंची भेट घेतली.

POINTS TABLE:

SCHEDULE TIME TABLE:

ORANGE CAP:

PURPLE CAP:

RESULTS TABLE:

VIDEO: पुण्यात मेट्रोचं कामावेळी सापडले दोन भुयारी मार्ग

First published: March 29, 2019, 8:52 PM IST
Tags: ipl 2019

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading