धोनी, ऋषभ आणि 'तो', स्पेशल भेटीच्या फोटोची सोशल मीडियावर चर्चा

धोनी, ऋषभ आणि 'तो', स्पेशल भेटीच्या फोटोची सोशल मीडियावर चर्चा

ऋषभ पंतनं घेतली धोनीची भेट, मात्र सोशल मीडियावर चर्चा 'त्याची'.

  • Share this:

रांची, 25 ऑक्टोबर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात रांची येथे तिसरा आणि अखेरचा कसोटी सामना खेळला गेला. या सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेला धुळ चारत 202 धावांनी मालिका व्हाईटवॉश दिला. या कसोटी मालिकेत प्लेइंग इलेव्हनमध्ये ऋषभ पंतला संधी देण्यात आली नव्हती. पंतच्या जागी ऋद्धिमान साहाला कसोटी संघात स्थान देण्यात आले होते.

दरम्यान, तिसऱ्या कसोटी सामन्यात तिसऱ्या दिवशी बोटाला दुखापत झाल्यामुळं साहाला काही काळ बाहेर बसावे लागले होते. त्यावेळी पुन्हा एकदा मैदानावर पंत दिसला. दरम्यान सामन्यानंतर पंत रांचीमध्येच राहिला आणि त्यानं महेंद्रसिंग धोनीची भेट घेतली.

पंतनं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर धोनीसोबतचे फोटो शेअर केले. यात धोनीच्या घरी पंतनं वेळ घालवला असे चित्र दिसले. यात धोनी, पंत यांच्यासोबत काही खास व्यक्तीही दिसून आले. हे होते, धोनीचे आवडते कुत्रे. धोनीला प्राण्यांची आवड असल्यामुळं त्याच्याकडे पाच ते सहा कुत्रे आहेत. यावेळी पंतनेही त्यांच्यासोबत वेळ घालवला. या फोटोंवर साहानं सकारात्मक उर्जा असे कॅप्शन दिले.

एकीकडे वर्ल्ड कप 2019नंतर धोनीनं भारतीय संघाकडून एकही सामना खेळलेला नाही. दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज दौऱ्यातही त्याला संघात जागा मिळाली नाही. त्यामुळं धोनी निवृत्त होणार असे असताना, आता तो 2020मध्ये कमबॅक करणार आहे, अशा बातम्या आल्या आहेत. दुसरीकडे बांगलादेश विरोधात धोनीला संघात जागा मिळाली नसली तरी, ऋषभ पंतला संघात संधी मिळीली आहे.

View this post on Instagram

Good Vibes Only @mahi7781

A post shared by Rishabh Pant (@rishabpant) on

वर्ल्ड कपमध्ये शिखर धवनच्या दुखापतीनंतर संघात जागा मिळालेल्या पंतला विशेष चांगली कामगिरी करता आली नाही. त्याच्या बेजबाबदार खेळीमुळं त्याच्यावर टीकाही झाली. एवढेच नाही तर बांगलादेश विरोधात संजू सॅमसनला संघात जागा देण्यात आली आहे. त्यामुळे पंतला संधी मिळणार की नाही याबाबत साशंकता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 25, 2019 06:19 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading