VIDEO : एक क्रिझ, दोन फलंदाज आणि रनआऊट...तरी भडकला पंत

मुंबईनं सुरुवात चांगली केली असली तरी, शेवटी मुंबईला पांड्या बंधूंनीच तारलं.

News18 Lokmat | Updated On: Apr 18, 2019 10:20 PM IST

VIDEO : एक क्रिझ, दोन फलंदाज आणि रनआऊट...तरी भडकला पंत

नवी दिल्ली, 18 एप्रिल : आयपीएलच्या बाराव्या हंगामात सध्या प्ले ऑफमध्ये पोहचण्यासाठी सर्व संघांमध्ये लढत सुरू असताना, मुंबई आणि दिल्ली यांच्यात चांगलीच चुरस पाहायला मिळत आहे.

दिल्लीच्या वादग्रस्त कोटला मैदानावर सामना सुरु असताना, मुंबईनं प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सुरुवात चांगली मिळाली असली तरी, मधल्या फळीतले फलंदाज विशेष चांगली कामगिरी करु शकले नाही. अखेर पांड्या बंधूंच्या मदतीनं मुंबईनं दिल्लीसमोर 169 धावांचे आव्हान ठेवले.



दरम्यान रोहित शर्मा 30 धावांवर बाद झाल्यानंतर सुर्यकुमार यादव आणि क्विंटन डी कॉक यांच्यावर जबाबदारी आली. मात्र अक्सर पटेलच्या 9व्या ओव्हरमध्ये सुर्यकुमार यादव आणि डी कॉक यांच्यातल्या समन्वयाच्या अभावमुळं डी कॉकला आपली विकेट टाकावी लागली.

तर, झालं असं की, अक्सर पटेल गोलंदाजी करत असताना, सुर्यकुमार यादव फलंदाजी करत होता. मात्र, त्यांन धाव काढण्यासाठी कॉल दिल्यानंतरही तो धावला नाही. दरम्यान डी कॉक आणि सुर्यकुमार यादव दोघंही एकाच बाजूला आलं. हास्यास्पद गोष्ट म्हणजे दिल्लीचा गोलंदाज रबाडा यानं ज्या बाजूला दोन्ही फलंदाज आहे तिथेच बॉल थ्रो केला. त्यामुळं पंत चांगला भडकला. अखेर पंतनं चेंडू अक्सरकडं दिला आणि डी कॉक धावबाद झाला.



सद्यस्थितीत दिल्लीचा संघ चांगल्या फॉर्ममध्ये दिसत असून, मागील तिनही सामने त्यांनी जिंकले आहेत. मात्र, सामन्याआधीच दिल्लीला एक झटका बसला आहे. दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यर जखमी झाला आहे, त्यामुळं आजचा सामना तो खेळणार की नाही, याबाबत साशंकता आहे. बुधवारी सरावादरम्यान श्रेयसच्या हताला दुखापत झाली आहे. त्यानं आतापर्यंत आयपीएलमध्ये 266 धावा केल्या आहेत. तर दुसरीकडे मुंबईच्या संघाची कामगिरी या पर्वात म्हणावी तशी झालेली नाही. मुंबईला गेल्या तीन सामन्यांपैकी दोन सामन्यात विजय तर एका समान्यात पराभव स्विकारावा लागला.



VIDEO : नांदेडमध्ये रात्र 11 वाजेपर्यंत सुरू राहणार मतदान; 'हे' आहे कारण

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 18, 2019 10:13 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...