ऋषभ पंतला घ्यायची नाही धोनीची जागा, 'या' क्रमांकावर करणार फलंदाजी

वेस्ट इंडिज दौऱ्यात महेंद्रसिंग धोनीला विश्रांती देत, ऋषभ पंतला विकेटकिपर म्हणून संधी देण्यात आली आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 26, 2019 05:24 PM IST

ऋषभ पंतला घ्यायची नाही धोनीची जागा, 'या' क्रमांकावर करणार फलंदाजी

नवी दिल्ली, 26 जुलै : वर्ल्ड कपमध्ये सेमीफायनल सामन्यात पराभव मिळाल्यानंतर आता भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार आहे. 3 ऑगस्टपासून भारत वेस्ट इंडिज दौऱ्यावर कसोटी, टी-20 आणि एकदिवसीय क्रिकेट मालिका खेळणार आहे. दरम्यान या मालिकेत निवड समितीनं युवा चेहऱ्यांना संधी दिली. तर, माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला विश्रांती देत, ऋषभ पंतला विकेटकिपर म्हणून संधी देण्यात आली आहे.

वेस्ट इंडिज दौरा हा ऋषभ पंत, नवदीप सैनी, मनीष पांडे राहुल चहर या खेळाडूंसाठी महत्त्वाचा असणार आहे. दरम्यान ऋषभ पंत धोनीचा जागा घेणार की काय अशी चर्चा होती. मात्र एका वृत्तसंस्थेशी बोलताना पंतनं याबाबत स्पष्टीकरण दिले. पंतनं, "मी धोनीची जागा घेणार नाही. पण भारतीय संघासाठी मला चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यास आवडेल", असे मत व्यक्त केले.

वाचा-कोण होणार टीम इंडियाचा कोच? सेहवाग, जयवर्धनेसह 'ही' 4 नावे चर्चेत

याआधी पंत आयपीएलमध्ये चौथ्या क्रमांकावर दिल्ली कॅपिटल्सकडून फलंदाजी केली आहे. तसेच, वर्ल्ड कप 2019मध्ये पंतनं चांगली फलंदाजी केली मात्र सेमीफायनलमध्ये पंतनं बेजबाबदारपणे खेळला, त्यामुळं त्याच्यावर टीका करण्यात आली होती.

दरम्यान हिंदुस्थान टाईम्सशी बोलताना पंतनं, "माझी खास अशी काही स्टाईल नाही. मी परिस्थितीनुसार खेळतो. चौथ्या क्रमांकासाठी मी फलंदाजी केली आहे. त्यासाठी मी सज्ज आहे", असे सांगितले. युवा यष्टिरक्षक पंतने 2017मध्ये इंग्लंडविरुद्ध आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तर, 2018मध्ये त्यानं कसोटीत पदार्पण केले.

Loading...

वाचा-विराट-रोहितमधील मतभेद टोकाला, हिटमॅनने अनुष्काच्या माध्यमातून असा काढला राग

असा आहे वेस्ट इंडिजचा दौरा

वेस्ट इंडिज दौऱ्यात भारत तीन टी 20, तीन एकदिवसीय आणि दोन कसोटी सामने खेळणार आहे. या दौऱ्याची सुरुवात टी 20 मालिकेपासून होणार आहे. त्यानंतर एकदिवसीय मालिका 8 ऑगस्ट तर कसोटी मालिका 22 ऑगस्टला सुरू होणार आहे.

वाचा-वेस्ट इंडिजमध्ये 'हे' चार खेळाडू चालले नाही तर टीम इंडियातून होणार पत्ता कट!

पाण्यात नको ते धाडस करू नका, दुचाकीस्वार वाहून गेल्याचा थरारक VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 26, 2019 05:24 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...