News18 Lokmat

IPL 2019 : जेव्हा पुन्हा पंत बेबीसिटींग करतो तेव्हा...व्हिडियो व्हायरल

ऋषभ पंत बनला आपल्याच संघातील खेळाडूच्या मुलाचा बेबीसिटर.

News18 Lokmat | Updated On: Apr 13, 2019 06:56 PM IST

IPL 2019 : जेव्हा पुन्हा पंत बेबीसिटींग करतो तेव्हा...व्हिडियो व्हायरल

नवी दिल्ली, 13 एप्रिल : भारतीय क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक ऋषभ पंत 2018च्या ऑस्टेलिया दोऱ्यात चांगलाच गाजला होता. कारण या दौऱ्यात कसोटी मालिकेदरम्यान ऋषभ आणि ऑस्ट्रेलियन कर्णधार टीम पेन यांच्यातला वाद चांगलाच गाजला.

पेननं पंतला माझ्या मुलांचं बेबीसिटींग कर, असं सांगितलं आणि एका द्वंद्वाला तोंड फोडलं. ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर हा वाद थांबला असला तरीही, पंतला ‘बेबीसीटर’ हे टोपण नाव पडलं आहे. दरम्यान, शुक्रवारी कोलकाता नाइट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात धवनच्या मुलाला सांभाळतांना रिषभ दिसला. धवनचा मुलगा झोरावर याच्यासोबत पंत खेळत असताना, त्याच्या व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.यावेळी व्हिडिओमध्ये पंत झोरावरसोबत मस्ती करताना दिसला. त्यानं झोरावरला चक्क टॉवेलमध्ये गुंडाळून गोल-गोल फिरवलं. दरम्यान, शिखर धवन आणि ऋषभ पंतच्या फटकेबाजीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने विजय मिळवला. धवननं 63 चेंडूत 11 चौकार व 2 षटकार खेचत नाबाद 97 धावा केल्या. आयपीएलमधील पहिल्या शतकापासून त्याला वंचित रहावे लागले.


VIDEO: निवडणूक चिन्हाचा असाही प्रचार; बॅटच्या आकारात केली पिकाची कापणी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags: ipl 2019
First Published: Apr 13, 2019 06:56 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...