मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Ind vs SA T20: दोन मॅचमध्ये झीरो, पण तिसऱ्या टी20त दक्षिण आफ्रिकेच्या या हीरोनं ठोकलं शतक

Ind vs SA T20: दोन मॅचमध्ये झीरो, पण तिसऱ्या टी20त दक्षिण आफ्रिकेच्या या हीरोनं ठोकलं शतक

रायली रुसोची शतकी खेळी

रायली रुसोची शतकी खेळी

Ind vs SA T20: तिरुअनंतपूरम आणि गुवाहाटीच्या सामन्यात रायली रुसो खातं न खोलताच माघारी परतला होता. पण इंदूरच्या मैदानात चौफेर फटकेबाजी करताना रुसोनं नाबाद शतक झळकावलं.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Siddhesh Kanase

इंदूर, 4 ऑक्टोबर: इंदूरमध्ये दक्षिण आफ्रिकेनं गुवाहीटीमधली बॅटिंग पुढे सुरु ठेवली असंच चित्र होतं. फक्त यावेळी दक्षिण आफ्रिकेच्या डाववाचा नायक होता डेव्हिड मिलरऐवजी रायली रुसो. रायली रुसोनं भारतीय आक्रमणाचा खरपूस समाचार घेतला आणि पहिल्या दोन सामन्यांचा हिशोब चुकता केला. तिरुअनंतपूरम आणि गुवाहाटीच्या सामन्यात रायली रुसो खातं न खोलताच माघारी परतला होता. पण इंदूरच्या मैदानात चौफेर फटकेबाजी करताना रुसोनं नाबाद शतक झळकावलं.

रुसोचं पहिलं टी20 शतक

रुसोनं टी20 कारकीर्दीतलं पहिलं शतक ठोकताना नाबाद 100 धावा केल्या. त्यानं आपलं शतक अवघ्या 48 बॉल्समध्ये 7 फोर आणि 8 सिक्सर्सच्या मदतीनं पूर्ण केलं. याशिवाय क्विटन डी कॉकसह त्यानं तिसऱ्या विकेटसाठी 87 धावांची भागीदारीही साकारली त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला 20 ओव्हरमध्ये 3 बाद 227 धावा उभारता आल्या. रुसोनं दक्षिण आफ्रिकेकडून आतापर्यंत 21 टी20 सामन्यात 152 च्या सरासरीनं 558 धावा केल्या आहेत.

डी कॉकचं सलग दुसरं अर्धशतक

गुवाहाटीत 69 धावांची खेळी करणाऱ्या क्विंटन डी कॉकनं इंदूरमध्येही आपला फॉर्म कायम ठेवला. त्यानं सलामीला येत 43 बॉल्समध्ये 6 फोर आणि 4 सिक्ससह 68 धावा केल्या. डी कॉकनं रुसोच्या साथीनं दक्षिण आफ्रिकन डावाला आकार दिला. गेल्या सामन्यातही डी कॉकनं डेव्हिड मिलरच्या साथीनं 174 धावांची भागीदारी केली होती. मिलरनं त्या सामन्यात 106 धावा ठोकल्या होत्या. पण दक्षिण आफ्रिकेनं तो सामना 16 धावांनी गमावला.

First published:

Tags: Cricket news, Sports, Team india