राहुल द्रविडचे ते बूट पाहून पॉण्टिंगने उडवली खिल्ली, म्हणाला...

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉण्टिंग (Ricky Pointing) याने राहुल द्रविडच्या (Rahul Dravid) बुटांबाबतचा एक किस्सा चाहत्यांबरोबर शेयर केला आहे.

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉण्टिंग (Ricky Pointing) याने राहुल द्रविडच्या (Rahul Dravid) बुटांबाबतचा एक किस्सा चाहत्यांबरोबर शेयर केला आहे.

  • Share this:
    मुंबई, 18 जून : ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉण्टिंग (Ricky Pointing) याने राहुल द्रविडच्या (Rahul Dravid) बुटांबाबतचा एक किस्सा चाहत्यांबरोबर शेयर केला आहे. 2005 साली वर्ल्ड सीरिजदरम्यान आपण राहुल द्रविडचे बूट बघून हैराण झालो होतो. मी द्रविडला फूटबॉलचे बूट घालून बॅटिंग करताना पाहिलं, असं पॉण्टिंग एका मुलाखतीमध्ये म्हणाला. यामागचं कारणही पॉण्टिंगने या मुलाखतीमध्ये सांगितलं. क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या वेबसाईटशी बोलताना पॉण्टिंग म्हणाला, 'जेव्हा आम्ही 2005 साली आयसीसी सुपर सीरिजदरम्यान सराव करत होतो, तेव्हा मैदान ओलं होतं. मी खेळाडूंना फूटबॉलचे बूट घालून सराव करण्याचा सल्ला दिला, यामुळे खेळाडूंना पडण्याचा आणि पाय अडकण्याचा धोका कमी होतो. आमच्या या ट्रेनिंगला विरोधी टीमच्या खेळाडूंनीही पाहिलं.' 'राहुल द्रविडनेही फूटबॉलचे बूट घातलेले पाहून मी हैराण झालो. मी हे कधीही विसरू शकत नाही. मॅचच्या आधी काही वेळ द्रविड फूटबॉलचे बूट घालून सराव करत होता. क्रिकेटच्या टणक खेळपट्टीवर फूटबॉलचे बूट घालून सराव करणं कठीण असतं. राहुल द्रविडचे पाय खेळपट्टीवर सटकत होते,' असं पॉण्टिंगने सांगितलं. यानंतर रिकी पॉण्टिंगने राहुल द्रविडला फूटबॉलचे बूट फक्त फिल्डिंग करण्यासाठीच वापरायचे, असं सांगितलं. आयसीसी सुपर सीरिजच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने आयसीसी वर्ल्ड इलेव्हनचा दारूण पराभव केला होता. ऑस्ट्रेलियाने त्या दौऱ्यात झालेली एकमेव टेस्ट आणि 3 वनडे जिंकल्या होत्या. राहुल द्रविड त्या सीरिजमध्ये फ्लॉप ठरला होता. 3 वनडेमध्ये त्याला फक्त 46 रन करता आल्या होत्या. तर एकमात्र टेस्टमध्ये त्याने 2 इनिंगमध्ये 23 रन केले.
    Published by:Shreyas
    First published: