Home /News /sport /

T20 World Cup: बाबर आझमनं तोडला विराट कोहलीचा आणखी एक रेकॉर्ड

T20 World Cup: बाबर आझमनं तोडला विराट कोहलीचा आणखी एक रेकॉर्ड

पाकिस्तानचा कॅप्टन बाबर आझमची (Babar Azam) तुलना अनेक जण टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीशी (Virat Kohli) या वर्ल्ड कपमध्ये फॉर्मात असलेल्या बाबरनं विराटचा एक रेकॉर्ड तोडला आहे.

    मुंबई, 30 ऑक्टोबर: पाकिस्तान क्रिकेट टीमचा कॅप्टन बाबर आझम (Babar Azam) सध्या चांगलाच आनंदी आहे. टी20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2021) त्याची टीम फॉर्मात आहे. तसंच तो बॅटींगमध्ये कमाल दाखवतोय. अनेक जण त्याची तुलना टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीशी (Virat Kohli) करतात. या वर्ल्ड कपमध्ये फॉर्मात असलेल्या बाबरनं विराटचा एक रेकॉर्ड तोडला आहे. बाबरनं शुक्रवारी पाकिस्तानच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. पाकिस्ताननं दुबईत झालेल्या या मॅचमध्ये अफगाणिस्तानचा (Pakistan vs Afghanistan) 5 विकेट्सनं पराभव केला. या मॅचमध्ये बाबरनं पाकिस्तानकडून सर्वाधिक 51 रन काढले. त्याचं या स्पर्धेतील दुसरं अर्धशतक आहे. यापूर्वी त्यानं टीम इंडियाविरुद्धही अर्धशतक झळकावलं होतं. बाबर आझमनं पाकिस्तानची क्रिकेट टीमची कॅप्टनसी करताना फक्त 26 मॅचमध्ये 1000 रन पूर्ण केले आहेत. विराटनं ही कामगिरी 30 मॅचमध्ये केली होती. विराटनं आंतरराष्ट्रीय टी20 मॅचमध्ये टीम इंडियाची कॅप्टनसी करताना एकूण 1559 रन केले आहेत. तर बाबर आझमनं एकूण 1042 रन केले आहेत. आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये कॅप्टनसी करताना सर्वात जास्त रन ऑस्ट्रेलियाच्या एरोन फिंचच्या नावावर आहेत. त्यानं आत्तापर्यंत 1626 रन केले आहेत विराट कोहली 1559 रनसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. न्यूझीलंडचा कॅप्टन केन विल्यमसन तिसऱ्या क्रमांकावर असून त्यानं 1408 रन केले आहेत. या सर्वांमध्ये विराटची सरासरी सर्वात जास्त म्हणजे 48.71 आहे. तर बाबरनं कॅप्टनसी करताना 45.30 च्या सरासरीनं रन केले आहेत. अन्य कॅप्टनची सरासरी 30 पेक्षा कमी आहे. T20 World Cup: आसिफ अलीनं दुबईत पाडला सिक्सचा पाऊस, बेन स्टोक्सनं सांगितलं मोठं भविष्य गेल्या 3 वर्षात बाबरचा दबदबा बाबर आझमनं गेल्या तीन वर्षात आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वात जास्त रन काढले आहेत. त्यानं या कालावधीत 14227 रन काढलेत. तर विराटनं 1114 रन काढले आहेत. मात्र या कालावधीमध्ये बाबरनं एकूण 41 मॅच खेळल्या असून विराटनं फक्त 29 मॅच खेळल्या आहेत. विराटची या कालावधीमधील सरासरी 61.88 आहे. तर बाबरची 43.24 आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Babar azam, Pakistan, T20 world cup, Virat kohli

    पुढील बातम्या