सिडनी, 8 जानेवारी: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात सिडनीमध्ये (Sydney) सुरु असलेल्या तिसऱ्या टेस्टच्या पहिल्या दिवशी पावसामुळे फक्त 55 ओव्हर्सचा खेळ झाला. पावसाच्या अडथळ्यानंतरही ऑस्ट्रेलियानं पहिल्या दिवशी चांगली बॅटिंग केली. पहिल्या दिवसाच्या खेळात ऑस्ट्रेलियाच्या बॅट्समनला भारताचा विकेट कीपर ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) खराब कामगिरीचीही मदत झाली. पंतनं पहिल्या दिवशी विल पुकोव्हस्कीला (Will Pucovski) दोनदा जीवदान दिलं.
Pant gives Puc a life! #AUSvIND pic.twitter.com/PwhpHuJI4D
— cricket.com.au (@cricketcomau) January 7, 2021
A rollercoaster of emotions for Will Pucovski! Initially given out, but on closer inspection he's recalled to the crease! #OhWhatAFeeling@Toyota_Aus | #AUSvIND pic.twitter.com/WgT5lCRjAE
— cricket.com.au (@cricketcomau) January 7, 2021
ऋषभ पंतवर या खराब विकेट किपिंगबद्दल फॅन्स आणि एक्स्पर्ट्स या दोघांनीही टीका केली. गुरुवारी दिवसभर सोशल मीडियावरही (Social Media) पंतला चांगलंच ट्रोल करण्यात आलं. या सर्वानंतर ऑस्ट्रेलियाचा माजी कॅप्टन रिकी पॉन्टिंगनही (Ricky Ponting) पंतच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त केली. पॉन्टिंग हा दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) या ऋषभ पंतच्या टीमचा मुख्य प्रशिक्षक आहे.
काय म्हणाला पॉन्टिंग?
‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’ च्या वेबसाईटची बोलताना पॉन्टिंग म्हणाला की, “पंतनं पदार्पण केल्यापासून इतर कोणत्याही विकेट कीपरपेक्षा जास्त कॅच सोडले आहेत. पहिल्या दिवशी त्यानं जे दोन कॅच सोडले ते पकडायला हवे होते. पुकोव्हस्कीनं मोठं शतक लगावलं नाही, हे पंतचं नशिब आहे. पंतला त्याच्या विकेट किपिंगवर जास्त कष्ट घेणं आवश्यक आहे.
पंतचा खराब रेकॉर्ड
रिकी पॉन्टिंगच्या या मताला आकड्यांचा भक्कम आधार आहे. पंतनं 2018 मधील सुरुवातीपासून टेस्ट क्रिकेटमध्ये 0.86 टक्के कॅच सोडले आहेत. या काळात किमान 10 टेस्ट खेळणाऱ्या कोणत्याही विकेट कीपरपेक्षा ही आकडेवारी जास्त आहे. पंतला स्पिन बॉलर्सला विकेटकिपिंग करताना जास्त अडचणींचा सामना करावा लागतो. पंतनं फास्ट बॉलर्सच्या बॉलिंगवर 93 टक्के कॅच पकडल्या आहेत तर स्पिनर्सच्या बॉलिंगवर त्याला फक्त 56 टक्के कॅच घेता आले आहेत. कोणत्याही अन्य विकेट कीपरपेक्षा ही आकडेवारी खराब आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.