मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /ICC Ranking : चांगल्या कामगिरीचा कोहलीला फायदा, तिन्ही फॉरमॅटमध्ये विराटचा बोलबाला

ICC Ranking : चांगल्या कामगिरीचा कोहलीला फायदा, तिन्ही फॉरमॅटमध्ये विराटचा बोलबाला

भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन विराट कोहलीनं (Virat Kohli) इंग्लंड विरुद्धच्या (India vs England T20I Series) मागच्या दोन टी20 मॅचमध्ये नाबाद 73 आणि 77 रन काढले आहेत. याचा फायदा त्याला ICC च्या रँकिंगमध्ये झाला आहे.

मुंबई, 17 मार्च : भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन विराट कोहलीनं (Virat Kohli) इंग्लंड विरुद्धच्या   (India vs England T20I Series) मागच्या दोन टी20 मॅचमध्ये नाबाद 73 आणि 77 रन काढले आहेत. याचा फायदा त्याला ICC च्या रँकिंगमध्ये झाला आहे. ICC ने या आठवड्याची रँकिंग जारी केली आहे. यामध्ये टी20 रँकिंगमध्ये (ICC T20I Rankings) विराट सहाव्या क्रमांकावरुन पाचव्या क्रमांकावर आला आहे. त्याला 47 रेटींग पॉईंटचा फायदा झाला असून त्याचे आता 744 पॉईंट्स झाले आहेत. विराट वन-डे रँकिंगमध्ये पहिल्या आणि टेस्टमध्ये सध्या पाचव्या क्रमांकावर आहे. याचाच अर्थ क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात टॉप 5 मध्ये असणारा तो एकमेव बॅट्समन आहे.

इंग्लंड विरुद्धच्या सीरिजमध्ये खराब फॉर्ममध्ये असलेल्या केएल राहुल (KL Rahul) याचं नुकसान झालं आहे. तो आता तिसऱ्या क्रमांकावरुन चौथ्या क्रमांकावर आला आहे. राहुलचे 771 रेटींग पॉईंट आहेत. इंग्लंडचा डेव्हिड मलान अजूनही पहिल्या क्रमांकावर आहे. मलानचे 894 पॉईंट आहेत. तर ऑस्ट्रेलियाचा आरोन फिंच (830 पॉईंट) दुसऱ्या आणि पाकिस्तानचा बाबर आझम (801 पॉईंट) चौथ्या क्रमाकावर आहे.

भारताविरुद्ध नाबाद 83 रन काढणाऱ्या जोस बटलर (Jos Buttler) याच्या रँकिंगमध्ये पाच क्रमांकाची सुधारणा झाली आहे. तो आता 19 व्या क्रमांकावर आला आहे. बटलर त्याच्या करियरमधील सर्वश्रेष्ठ रँकिंगपासून दोन क्रमांक दूर आहे. ऑक्टोबर 2018 साली तो 17 व्या क्रमांकावर होता.

( वाचा : IND vs ENG : कोहलीचं खणखणीत रेकॉर्ड, केन विलियमसनच्या विक्रमाशी बरोबरी! )

वन-डे मध्येही विराट नंबर 1

भारताच्या अन्य बॅट्समनच्या T20 रँकींगचा विचार केला, तर श्रेयस अय्यरनं 32 क्रमांकाची झेप घेतली असून तो आता 31 व्या क्रमांकावर आहे. तर ऑल राऊंडरमध्ये वॉशिंग्टन सुंदर 11 व्या क्रमांकावर आहे. विकेटक किपर बॅट्समन ऋषभ पंत 80 व्या क्रमांकावर आहे.

वन-डे रँकिंगमध्ये विराट कोहली 870 रेटिंग पॉईंट्सह पहिल्या क्रमांकावर आहे. वेस्ट इंडिजच्या शाही होपला श्रीलंकेविरुद्ध चाांगलं खेळल्याचा फायदा झाला आहे. तो आता डेव्हिड वॉर्नरसह सातव्या क्रमांकावर आहे. वन-डे रँकिंगमध्ये रोहित शर्मा (842 पॉईंट्स) दुसऱ्या तर बाबार आझम (837 पॉईंट्स) तिसऱ्या क्रमांकावर आहे.

First published:

Tags: Cricket, Icc, Rishabh pant, Rohit sharma, Sports, Virat kohli