Home /News /sport /

IND vs WI : वेस्ट इंडिज विरुद्धच्या मालिकेचे वेळापत्रक बदलणार, 2 शहरांमध्येच होणार सर्व सामने

IND vs WI : वेस्ट इंडिज विरुद्धच्या मालिकेचे वेळापत्रक बदलणार, 2 शहरांमध्येच होणार सर्व सामने

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (India vs West Indies) यांच्यात फेब्रुवारीमध्ये 3 वन-डे आणि तितक्याच टी20 सामन्यांची मालिका होणार आहे. बीसीसीआय या मालिकेच्या वेळापत्रकात बदल करण्याच्या विचारात आहे.

    मुंबई, 20 जानेवारी : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यातील वन-डे सामन्यांची मालिका सध्या सुरू आहे. या मालिकेनंतर टीम इंडिया वेस्ट इंडिजची सामना (India vs West Indies) करणार आहे. भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात फेब्रुवारीमध्ये 3 वन-डे आणि तितक्याच टी20 सामन्यांची मालिका होणार आहे. बीसीसीआय या मालिकेच्या वेळापत्रकात बदल करण्याच्या विचारात आहे. बीसीसीआयच्या सूत्रांनी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, 'हे सर्व सामने अहमदाबाद आणि कोलकाता या दोन शहरांमध्येच घेण्यात यावे अशी शिफारस बीसीसीआयच्या टूर्स अँड फिक्सचर समितीनं केली आहे. आता बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) आणि सचिव जय शहा (Jay Shah) येत्या एक दोन दिवसांमध्ये याबाबत अंतिम निर्णय घेतील. नियोजित वेळापत्रकानुसार अहमदाबादसह जयपूर, कोलकाता, कटक, विशाखापट्टणम आणि तिरुअनंतपुरममध्ये या मालिकेतील सामने होणार आहेत. 6 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी दरम्यान ही मालिका होणार आहे. पण, देशातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता अहमदाबाद आणि कोलकाता या दोन शहरांमध्ये सर्व सामने घेण्याचा निर्णय लवकरच जाहीर होऊ शकतो. वन-डे टीमचा नियमित कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) या वेस्ट इंडिज विरुद्धच्या मालिकेसाठी फिट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारतीय फॅन्सना याची मोठी उत्सुकता आहे. रोहित दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाऊ शकला नाही. त्याच्या अनुपस्थितीमध्ये केएल राहुल (KL Rahul) भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यातील वन-डे मालिकेत टीम इंडियाचा कॅप्टन आहे. IND vs SA: पहिल्या परीक्षेत कॅप्टन राहुल फेल, पराभवाची दिली 2 कारणं टीम इंडियाचे 2022 मधील वेळापत्रक चांगलेच व्यस्त आहे. वेस्ट इंडिज मालिकेनंतर टीम इंडियात होम ग्राऊंडवर श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध लिमिटेड ओव्हर्स क्रिकेटची मालिका खेळेल. त्यानंतर ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी20 वर्ल्ड कप स्पर्धेत सहभागी होईल. ऑक्टोबर महिन्यात टी20 वर्ल्ड कप सुरू होणार आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: BCCI, Cricket news, Team india, West indies

    पुढील बातम्या