मुंबई, 28 जानेवारी : अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये (Under 19 World Cup) बॅटींगनं वादळ निर्माण करणारा बेबी एबी डीव्हिलियर्स (Baby AB De Villiers) म्हणजेच दक्षिण आफ्रिकेचा डेवाल्ड ब्रेविस (Dewald Brevis) आयपीएल खेळेण्यासाठी सज्ज आहे. ब्रेविसनं आयपीएल मेगा ऑक्शनसाठी (IPL 2022 Maga Auction) नाव नोंदवलं आहे. त्यामुळे डीव्हिलियर्ससारखी बॅटींग करणाऱ्या ब्रेविसला कोणती टीम खरेदी करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
ब्रेविसनं अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये जबरदस्त कामगिरी केली होती. त्यानं 4 मॅचमध्ये 65, 104, 96 आणि 97 रन केले. दक्षिण आफ्रिकेची टीम स्पर्धेतून बाद झाली आहे. पण ब्रेविसनं 90.50 च्या सरासरीनं 362 रन केले आहेत. दक्षिण आफ्रिकेचा माजी कॅप्टन एबी डीव्हिलियर्स (AB de Villiers) याने मागच्या वर्षी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्यानंतर त्याची कमतरता ब्रेविस भरून काढेल अशी फॅन्सना आशा आहे.
ब्रेविस देखील डीव्हिलियर्ससारखी 360 डिग्रीमध्ये बॅटींग करतो. तसेच 17 नंबरची जर्सी घालतो. ब्रेविसची आई त्याच्यासाठी ही जर्सी तयार करते. तो डीव्हिलियर्सला पहिल्यांदा भेटला होता तेव्हा त्याने 17 नंबरची जर्सी घालण्याची परवानगी त्याच्याकडे मागितली होती. डीव्हिलियर्सकडून परवानगी मिळाल्यानंतर त्याने ही जर्सी घालण्यास सुरूवात केली.
जल्लोष तर होणारच! वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये जाताच अफगाणिस्तानचे जोरदार सेलिब्रेशन, VIDEO
ब्रेविसनं काही दिवसांपूर्वी एका व्हिडीओमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) टीमकडून खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. कारण, या टीमकडून डीव्हिलियर्स खेळला आहे. त्याचबरोबर विराट कोहली (Virat Kohli) देखील आरसीबीकडून खेळतो. ब्रेविस आयपीएल लिलावात मालामाल होण्याची शक्यता आहे. तो लेगस्पिन बॉलिंग देखील करतो, त्याचा फायदा त्याला ऑक्शनमध्ये मिळू शकतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.