यंदा कर्तव्य आहे! स्टार क्रिकेटपटू अडकणार सर्बियन मॉडेलच्या बंधनात

यंदा कर्तव्य आहे! स्टार क्रिकेटपटू अडकणार सर्बियन मॉडेलच्या बंधनात

सर्बियन मॉडेलच्या प्रेमात पडला टीम इंडियाचा स्टार खेळाडू

  • Share this:

मुंबई, 22 ऑक्टोबर : भारतीय संघातील खेळाडूंच्या अफेअरच्या चर्चा या सोशल मीडियावर नेहमीच होत असतात. या ब्रेकअप, पॅचअप, घटस्फोट या गोष्टी नेहमीच होत असतात. आता आणखी खेळाडूच्या अशा चर्चा सोशल मीडियावर सतत होत असतात. यातच बॉलिवूड आणि क्रिकेट यांचे संबंध नेहमीच प्रेमाचे असतात, मग यात अनुष्का-विराट यांची जोडी असो किंवा जहीर आणि सागरिका घाटगे असो. बॉलिवूड अभिनेत्री आणि क्रिकेकपटू यांचे नेहमीच जवळचे संबंध राहिले आहेत. आता एका सर्बियन मॉडेल, डान्सर आणि अभिनेत्रीच्या प्रेमात भारतीय संघाचा एक स्टार खेळाडू बुडाला आहे. यांच्यातील गोष्टी एवढ्या पुढ्या गेल्या की एकमेकांच्या कुटुंबीयांनीही भेट घेतली.

भारतीय संघ सध्या पुढच्या वर्षी भारतात होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपची तयारी करत आहे. या सगळ्यात भारताचा स्टार खेळाडू हार्दिक पांड्या आपल्या लग्नाच्या तयारीला लागला आहे. हार्दिक आणि सर्बियन मॉडेल नताशा स्टॅन्कोविक यांच्यात जवळचे संबंध आहेत. याआधी हार्दिकचे नाव अनेक अभिनेत्रींशी जोडले गेले होते, मात्र आता हार्दिक आणि नताशा लग्नबंधनात अडकण्याच्या तयारीत आहेत.

स्टॉपबॉय या वृत्तसंस्थेनं दिलेल्या बातमीनुसार, हार्दिक आणि नताशा यांच्यातील नाते पुढच्या टप्प्यावर घेऊन जाण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. त्यामुळं हार्दिकनं आपल्या परिवारासोबत नताशाची भेट घडवून आणली. या रिपोर्टनुसार, हार्दिकच्या घरचे या दोघांच्या लग्नासाठी तयार आहेत.

वाचा-पगारवाढीसाठी कर्णधारासह संपूर्ण संघ संपावर, टी-20 वर्ल्ड कप धोक्यात

 

 

 

 

View this post on Instagram

 

 

 

To my best friend, the strongest and the most beautiful soul. This year has been a roller coaster ride for you. Many great things happen and some were not that great but definitely have made you stronger. You have been such an inspiration for all of us and I couldn’t be more proud of you for everything you have done for yourself and people around you, for everything you have gone through and still decided to stand tall and get out of it like a winner . Keep shining, smiling and getting stronger. You are on the right track. Stay focused. I’ll always have your back. Happy bday HP ❤️ God bless you @hardikpandya93 #happyface

A post shared by Nataša Stanković (@natasastankovic__) on

वाचा-VIDEO : मैदानावर सहकारी बनला शत्रू, आफ्रिकेच्या डावाचा असा झाला शेवट

कोण आहे नताशा

नताशा मुळची सर्बियाची आहे. वयाच्या तिसऱ्या वर्षीपासून तिने डान्स शिकायला सुरवात केली. नच बलिए 9 मध्ये तिने सहभाग घेतला होता. एवढेच नाही तर बॉलिवडूमध्ये नताशानं एन्ट्री केली ती ‘डॅडी’ या चित्रपटात एका आयटम साँगवर थिरकत. तिच्या याच अदांवर घायाळ झाला आहे, टीम इंडियाचा स्टार खेळाडू हार्दिक पांड्या.

याआधीही सोशल मीडियावर दिली होती कबुली

भारतीय संघाचा खेळाडू हार्दिक पांड्यानं आपल्या एका सोशल मीडियावर पोस्टवर आपल्या प्रेमाची कबुलीही दिली आहे. एवढेच नाही तर नव्या गर्लफ्रेंडविषयी हार्दिक गंभीर असून त्यानं नताशाची कुटुंबीयांसोबत भेटही घडवून आणली. त्यामुळं सध्या हार्दिक पांड्या या नव्या नात्याबाबत खुश आहे. याआधी हार्दिक पांड्याचे नाव बऱ्याच अभिनेत्रींसोबत जोडले गेले होते. रविवारी इन्स्टाग्रामवर पांड्यानं इन लव्ह अशी पोस्ट केली होती. यावर नताशानं तशीच प्रतिक्रिया दिली.ॉ

वाचा-VIDEO : 'साला मत बोलो यार', रोहित शर्माचं पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 22, 2019 02:07 PM IST

ताज्या बातम्या