SRH vs RCB : बंगळुरूनं केला शेवट गोड, हैदराबादवर 4 विकेटनं विजय

बंगळुरूच्या या विजयामुळं प्ले ऑफमध्ये कोणता संघ प्रवेश करणार हे गुढ कायम आहे.

News18 Lokmat | Updated On: May 4, 2019 11:48 PM IST

SRH vs RCB : बंगळुरूनं केला शेवट गोड, हैदराबादवर 4 विकेटनं विजय

बेंगळूरु, 04 मे: आयपीएलमध्ये गुणतालिकेत तळाला असलेल्या बंगळुरूनं हैदराबादला नमवत आपला शेवट गोड केला. हेटमायर आणि गुरुकिरत यांच्या शतकी भागीदारीच्या जोरावर बंगळुरुनं हा सामना जिंकला. हेटमायरनं 47 चेंडूत 75 धावा केल्या. तर, गुरकिरत सिंग मान यानं 48 चेंडूत 65 धावा केल्या. या दोघांच्या भागीदारीच्या जोरावर बंगळुरूनं हा सामना जिंकला. बंगळुरूच्या या विजयामुळं हैदराबादचं प्ले ऑफमध्ये जाणं मुश्किल झालं आहे. 175 धावांचा पाठलाग करताना, विराट कोहली आणि एबी लवकर बाद झाले. त्यानंतर हेटमायर आणि गुरकिरत सिंग यांनी एकहाती सामना जिंकवून दिला. या सामन्यामुळं आता प्ले ऑफमध्ये कोणता संघ जाणार हे गुढ मात्र कायम आहे.बंगळुरूनं प्रथम टॉस जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. दरम्यान उमेश यादवच्या शेवटच्या ओव्हरमध्ये त्यानं तब्बल 27 धावा दिल्या. हैदराबादनं बंगळुरूला 176 धावांचे आव्हान दिलं. यात केन विल्यमसनची अर्धशतकी खेळी महत्त्वाची ठरली. सलामीला आलेल्या रिध्दीमान साहा आणि मार्टिन गुपतील यांनी 46 धावांची भागीदारी केली, त्यानंतर उमेश यादवनं हैदराबादला पहिला झटका दिला. त्यानंतर गुपतील 30 करत बाद झाला. सलग अर्धशतक करणाऱ्या मनिषा पांडेला या सामन्यात मात्र चांगली फलंदाजी करता आली नाही. मात्र, कर्णधार केन विल्यमसननं एकहाती सामना सांभाळला. केननं 43 चेंडूत 70 धावा केल्या. उमेश यादवच्या शेवटच्या ओव्हरमध्ये केननं 6,4,6,4 अश्या तब्बल 27 धावा दिल्या.


Loading...


बंगळुरूकडून वॉशिंग्टन सुंदरनं 24 धावा देत 3 विकेट घेतल्या. तर, नवदीप सैनीनं 2 विकेट घेत 34 धावा दिल्या. तर, एका विकेटसह चहलनं आयपीएलमधल्या आपल्या 100 विकेट पुर्ण केल्या.


VIDEO : किळसवाणा प्रकार, पुण्यातील हाॅस्पिटलमध्ये जेवणात आढळले रक्ताने माखलेले बोळे!


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: ipl 2019
First Published: May 4, 2019 07:33 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...