S M L

IPL 2019 : अखेर...विराटचा दुष्काळ संपला, पंजाबवर शानदार विजय !

सलग सहा सामन्यात पराभव मिळाल्यानंतर अखेर दणक्यात विराटच्या सेनेनं आपला पहिला विजय नोंदवला.

Updated On: Apr 13, 2019 11:43 PM IST

IPL 2019 : अखेर...विराटचा दुष्काळ संपला, पंजाबवर शानदार विजय !

मोहाली, 13 एप्रिल : सलग सहा सामन्यात पराभव मिळाल्यानंतर अखेर दणक्यात विराटच्या सेनेनं आपला पहिला विजय नोंदवला. या विजयासाठी विराटला चक्क सात सामन्यांची वाट पाहावी लागली.

या विजयाच्या मागे एबी डिव्हिलियर्सच्या अर्धशतकी खेळाचा मोठा हा होता. तर, विराटनं 53 चेंडूत 67 धावा करत आपल्या संघाला विजयाच्या जवळ नेले. तर एबीनं 59 धावा केल्या.

प्रथम टॉस जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेताना, अखेरच्या षटकात ख्रिस गेलनं केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर पंजाबनं बंगळुरूला १७४ धावांचे आव्हान दिले. दरम्यान या आव्हानाचा पाठलाग करताना पार्थिव पटेलने ४ चौकार लगावत दणकेबाज सुरुवात केली होती. पण मोठा फटका खेळताना तो झेलबाद झाला. त्याने ९ चेंडूत १९ धावा केल्या. त्यानंतर विराट कोहलीच्या रुपात बंगळुरुला मोठा धक्का बसला. कोहलीने 53 चेंडूंत 67 धावा केल्या. पण एबीच्या मॅच विनिंग खेळी करत आपल्या संघाला आयपीएलच्या बाराव्या हंगामातील पहिला विजय मिळवून दिला. मार्कस स्टोइनीसनं एबीला चांगली साथ देत, चेंडूत धावा केल्या.

दरम्यान या सामन्याच्या सुरूवातीला बंगळुरू संघानं पंजाबच्या फलंदाजांना मैदानावर जास्त काळ टिकू दिलं नाही. दरम्यान ख्रिस गेलच्या एकाकी झुंजच्या बळावर पंजाबनं बंगळुरूसमोर धावांचे आव्हान ठेवले. विराटनं गेलचा 19व्या षटकात सोडलेला झेल बंगळुरूच्या संघाला महागात पडला. शेवटच्या षटकात ख्रिस गेलच्या धडेकाबाज फलंदाजीमुळे बंगळुरुच्या गोलंदाजांना लोटांगण घालण्याची पाळी आली. पण विराटनं सामना जिंकला.


VIDEO: निवडणूक चिन्हाचा असाही प्रचार; बॅटच्या आकारात केली पिकाची कापणी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags: ipl 2019
First Published: Apr 13, 2019 08:03 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close