धोनीच्या संघातील 'या' खेळाडूची विकेट विराटच्या संघाला पडली कोट्यवधी रुपयांना

आरसीबीला यंदाच्या हंगामात एकही विजय मिळवता आलेला नाही.

News18 Lokmat | Updated On: Apr 5, 2019 08:34 PM IST

धोनीच्या संघातील 'या' खेळाडूची विकेट विराटच्या संघाला पडली कोट्यवधी रुपयांना

आयपीएल 2019 च्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूला आतापर्यंत एकही सामना जिंकता आलेला नाही. महागडे खेळाडू संघात असूनही त्यांची कामगिरी मात्र निराशाजनक आहे.

गेल्या वर्षी झालेल्या आयपीएलच्या लिलावात अनेक खेळाडूंना मोठी रक्कम देऊन आरसीबीने पुन्हा संघात घेतले. यात मार्कस स्टोइनस 6.4 कोटी, उमेश यादव 4.30 कोटी, शिवम दुबे 5 कोटी, युझवेंद्र चहलला 6 कोटी रुपये मोजले. या चार खेळाडूंसाठीच संघाचे 20 कोटी खर्च झाले.

यंदाच्या हंगामात झालेल्या चार सामन्यात कोहलीच्या संघाला पराभव पत्करावा लागला आहे. महागड्या गोलंदाजांचा भरणा संघात असतानाही संघाला शेन वॉटसनची विकेट कोट्यवधी रुपयांना पडली आहे.

Loading...

गेल्या चार सामन्यातील पॉवर प्लेमध्ये बेंगलोरच्या संघाला फक्त एकच गडी बाद करता आला आहे. पहिल्या सामन्यात युझवेंद्र चहलने शेन वॉटसनला बाद केलं होतं. त्यानंतर आरसीबीच्या एकाही गोलंदाजाला विकेट घेता आलेली नाही.

चार सामन्यामध्ये एकूण 24 ओव्हर्स टाकल्या. मात्र यात केवळ एकच विकेट गोलंदाजांना घेता आली. कोट्यवधी रुपये खर्चून संघात घेतलेल्या या खेळाडूंनी पॉवर प्लेमध्ये निराशाच केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 5, 2019 08:34 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...