गुजरात लायन्सचा विराटच्या टीमवर 'राॅयल' विजय

गुजरात लायन्सचा विराटच्या टीमवर 'राॅयल' विजय

बंगळूर राॅयलने पहिली बॅटिंग करत 134 रन्सचं माफक आव्हान उभं केलं. गुजरात टीमने हे आव्हान 3 विकेट देऊन 13.5 ओव्हरमध्ये पार केलं.

  • Share this:

27 एप्रिल : बंगळुर राॅयलच्या खात्यात आणखी एका पराभवाची नोंद झालीये. आॅलराऊंडर खेळी करत सुरेश रैनाच्या गुजरात लायन्सने विराट कोहलीच्या राॅयल चॅलेंजर्सचा 7 विकेटने पराभूत केलंय.

बंगळूर राॅयलने पहिली बॅटिंग करत 134 रन्सचं माफक आव्हान उभं केलं. गुजरात टीमने हे आव्हान 3 विकेट देऊन 13.5 ओव्हरमध्ये पार केलं.

एराॅन फिंचने शानदार खेळी पेश करत 34 बाॅलमध्ये 4 चौकार आणि 6 सिक्स लगावत 72 रन्सची खेळी केली. तर कॅप्टन सुरेश रैनाने नाॅटआऊट 34 रन्स केले.

या विजयासह पाईंट टेबलमध्येही गुजरात टीमने बंगळूर राॅयलला मात दिलीये. गुजरात टीम सहाव्या स्थानावर पोहचलीये. या पराभवामुळे विराटच्या टीमचा आयपीलमधला प्रवास जवळपास संपुष्टात आलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 27, 2017 11:54 PM IST

ताज्या बातम्या