RCB चा सलग सहावा पराभव, दिल्लीचा 4 गडी राखून विजय

RCB चा सलग सहावा पराभव, दिल्लीचा 4 गडी राखून विजय

आरसीबीचा हा यंदाच्या आयपीएलमधील सलग सहावा पराभव आहे.

  • Share this:

बेंगळुरू, 7 एप्रिल : आरसीबीचा दिल्लीने 6 विकेट राखून पराभव केला. 150 धावांचे आव्हान दिल्लीने 6 गड्यांच्या मोबदल्यात 18.5 षटकांत पूर्ण केले. या पराभवाने आरसीबीचं आयपीएलच्या बाद फेरीत प्रवेश करणं कठिण झालं आहे. कसिगो राबाडाच्या भेदक माऱ्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यरच्या अर्धशतकाच्या जोरावर दिल्लीने आरसीबीवर विजय मिळवला. आरसीबीने दिलेल्या 150 धावांचा पाठलाग करताना पहिल्याच षटकात दिल्लीला पहिला धक्का बसला. टीम साउथीने सलामीवीर शिखर धवनला शून्यावर बाद केले.

कर्णधार श्रेयस अय्यरने पृथ्वी शॉसोबत 68 धावांची भागिदारी केली. शॉला नेगीने अक्षदीपकडे झेल देण्यास भाग पाडले. पृथ्वीने 22 चेंडूत 5 चौकारांसह 28 धावा केल्या. त्यानंतर कोलिन इनग्रामसोबत श्रेयसने 39 धावांची भागिदारी केली. इनग्रामला मोईन अलीने 22 धावांवर पायचित केले. इनग्रामनंतर अय्यर बाद झाला त्यावेळी संघाच्या 145 धावा झाल्या होत्या. अय्यरने अय्यरनंतर लगेच ख्रिस मॉरिस बाद झाला. दोघांनाही नवदीप सैनीने बाद केलं. 19 व्या षटकात सिराजने ऋषभ पंतला बाद केले. पंतने 14 चेंडूत 18 धावांची खेळी केली.

तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरने गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीला मैदानात उतरलेल्या आरसीबीला 20 षटकांत 149 धावा करता आल्या. दुसऱ्याच षटकात ख्रिस मॉरिसने पहिला धक्का दिला. त्याने पार्थिव पटेलला 9 धावांवर बाद केले. त्यानंतर सहाव्या षटकात एबी डीव्हिलियर्सला रबाडाने बाद केले. एबीने 16 चेंडूत 17 धावा केल्या. मार्कस स्टोइनसला अक्षर पटेलने 15 धावांवर राहुल तेवातियाकडे झेल देण्यास भाग पाडले. त्याच्यानंतर मोइवन अली आणि कोहलीने 15 व्या षटकात संघाचे शतक पूर्ण केले. त्यानंतर मोइन अलीला लामिछानेने बाद केले. अलीने 18 चेंडूत 3 षटकारांसह 31 धावा केल्या.

दरम्यान, विराट कोहली एका बाजूने फटकेबाजी करत होता. त्याला कासिगो रबाडाने बाद केले. विराटने 33 चेंडूत 2 षटकार आणि एका चौकारासह 41 धावा केल्या. त्याच षटकात रबाडाने पवन नेगी आणि अक्षदीप नाथ यांना बाद केले. नेगी शून्यावर तर नाथ 19 धावांवर बाद झाला. 19 व्या षटकात ख्रिस मॉरिसने मोहम्मद सिराजला एका धावेवर बाद केलं. तर टीम साउथी 9 धावांवर तर युझवेंद्र चहल एका धावेवर नाबाद राहिला.

दिल्लीकडून रबाडाने 4 षटकांत 21 धावांत 4 बळी घेतले. त्याच्यानंतर ख्रिस मॉरिसने 28 धावांत 2 गडी बाद केले. तर अक्षर पटेल आणि संदीप लामिछाने यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

VIDEO: 'जिथे भाजप-सेनेचे उमेदवार तिथे राज ठाकरेंनी हमखास जाहीर सभा घ्यावी'


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 7, 2019 07:22 PM IST

ताज्या बातम्या