IPL 2019 : धोनीच्या 84 धावांच्या खेळीनंतरही, बंगळुरूनं जिंकला सामना

धोनी 48 चेंडूत नाबाद 84 धावा केला. त्याची ही खेळी व्यर्थ गेली.

News18 Lokmat | Updated On: Apr 21, 2019 11:59 PM IST

IPL 2019 : धोनीच्या 84 धावांच्या खेळीनंतरही, बंगळुरूनं जिंकला सामना

बंगळुरू, 21 एप्रिल : अंकतालिकेत पहिल्या क्रमांकावर असेलल्या चेन्नई सुपर किंग्ज संघ आणि तळाला असलेला बंगळुरू संघ यांच्यात आज एकतर्फी सामना होईल असे वाटत होते. परंतु तसे घडले नाही.हा सामना एवढा अटीतटीचा झाला की बंगळुरूनं केवळ एका धावानं सामना जिंकला.दरम्यान धोनी 48 चेंडूत नाबाद 84 धावा केला. त्याची ही खेळी व्यर्थ गेली असली तरी, बंगळुरू संघानं आपला तिसरा विजय नोंदवला.


Loading...


एकीकडं गुणतालिकेतील अव्वल संघ चेन्नई सुपर किंग्ज आणि तळाचा संघ रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरु आज सामना होत आहे. या सामन्यात चेन्नईनं टॉ जिंक गोलंदाजी घेण्याचा निर्णय घेतला आहे. आणि हा निर्णय चेन्नईच्या गोलंदाजांनी योग्य ठरवत बंगळुरू संघाला 161 धावांवर रोखलं. चेन्नईनं प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेत बंगळुरूला 161 धावांवर रोखले. मात्र, बंगळुरूच्या फलंदाजांनी चांगली कामगिरी केली नसली तरी, गोलंदाजांनी त्यांची कसर भरुन काढली. 161 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना, सलामीला आलेल्या शेन वॉटसन आणि ड्युप्लेसीस यांना डेल स्टेननं सुरुवातही करु दिली नाही. आपल्या पहिल्या ओव्हरच्या पाचव्या चेंडूवरच स्टेननं चेन्नईला पहिला झटका दिला. डेल स्टेनला केवळ पाच धावांवर बाद केलं.त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या सुरेश रैनाकडून संघाच्या अपेक्षा होत्या. कारण आयपीएलमधल्या सर्वात जास्त धावा करण्याचा यादीत रैनाचा पहिला क्रमांक लागतो. मात्र, डेल स्टेनच्या पहिल्याच ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर अप्रतिम यॉर्कर टाकून स्टेननं सुरेश रैनाचा त्रिफळा उडवला.

प्रथम फलंदाजी पार्थिव पटेलच्या एकाकी झुंज मुळं बंगळुरू संघानं या धावांपर्यंत मजल मारली.पटेलने 36 चेंडूंत अर्धशतक झळकावले. पण, पुढच्याच चेंडूवर ब्राव्होने त्याला माघारी पाठवले. पार्थिवचे हे आयपीएलमधले 17वे अर्धशतक आहे. तर, शेवटच्या दोन षटकात मोईन अलीनं आक्रमक फलंदाजी करत बंगळुरू संघाला 161 धावांपर्यंत पोहचवले. मोईन अली 26 धावा करत बाद झाला.चेन्नईने नाणेफेक जिंकून यजमान बंगळुरूला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. सावध सुरुवातीनंतर विराट कोहली आणि पार्थिव पटेल ही जोडी चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या चक्रव्युहात अडकली. सामन्याच्या तिसऱ्याच षटकात दीपक चहरने चेन्नईला पहिले यश मिळवून देताना कोहलीला यष्टिरक्षक धोनीकरवी झेलबाद केले. कोहली 9 धावांवर माघारी परतला.एबी डिव्हिलियर्सने या सामन्यातून पुनरागमन केले. आयपीएलमधील त्याचा हा 150 वा सामना ठरला आणि हा पल्ला गाठणारा तो पहिलाच परदेशी खेळाडू आहे. त्याने बंगळुरूचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. 6व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर डिव्हिलियर्सने टोलावलेला चेंडू फॅफ ड्यु प्लेसिसने टिपण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याला यश आले नाही. पटेलने 36 चेंडूंत अर्धशतक झळकावले. पण, पुढच्याच चेंडूवर ब्राव्होने त्याला माघारी पाठवले. शेन वॉटसनने त्याचा झेल टिपला. त्यानंतर मोईन अलीनं शेवटच्या दोन षटकात संयमी फलंदाजी केली. चेन्नईकडून दिपक चहर आणि रविंद्र जडेजा यांनी दोन विकेट घेतल्या.
VIDEO : राहुल गांधींवर टीका करताना पंकजा मुंडेंची जीभ घसरली

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: ipl 2019
First Published: Apr 21, 2019 07:35 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...