• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • IPL 2021: RCB च्या खेळाडूंनी घातली निळी जर्सी, कारण वाचून वाढेल आदर

IPL 2021: RCB च्या खेळाडूंनी घातली निळी जर्सी, कारण वाचून वाढेल आदर

रविवारपासून सुरू झालेल्या आयपीएल सामन्यांच्या दुसऱ्या भागात (RCB players wear blue jersey today) सोमवारी विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची टीम निळ्या जर्सीसह मैदानात उतरली.

 • Share this:
  बंगळुरू, 20 सप्टेंबर : रविवारपासून सुरू झालेल्या आयपीएल सामन्यांच्या दुसऱ्या भागात (RCB players wear blue jersey today) सोमवारी विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची टीम निळ्या जर्सीसह मैदानात उतरली. सुरुवातीला या टीमचा नेहमीपेक्षा वेगळा पेहराव पाहून सर्वांनाच आश्चर्याचा (RCB surprise jersey) धक्का बसला. अनेकांच्या तर भुवयाही उंचावल्या. मात्र टीमचा कॅप्टन विराट कोहलीनं याचं कारण सांगताच सर्वांना त्यामागची भूमिका पटली. हे आहे कारण रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या टीमची जर्सी आहे लाल आणि काळ्या रंगाची. मात्र आरसीबीनं फिकट निळ्या आणि काळ्या रंगाची जर्सी घालून मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला. टॉससाठी जेव्हा कॅप्टन विराट कोहली मैदानात आला, त्यावेळी त्यानं यामागचं कारण जाहीर केलं. आम्ही यंदाचा आयपीएल सिझन हा कोरोना वॉरियर्ससाठी खेळणार असल्याचं मे महिन्यातच जाहीर केलं होतं. आज आम्ही जी जर्सी घातली आहे, ती आहे कोरोना वॉरियर्सची. कोरोना रुग्णांची सेवा करणाऱ्या कोरोना योद्ध्यांनी याच जर्सीत रुग्णांच्या सेवेचं काम केलं आहे. त्यांना मानवंदना देण्याचा आमचा प्रयत्न असून त्यांच्यामुळेच आज देश कोरोनापासून मुक्त होण्याच्या दिशेनं पावलं टाकत असल्याची प्रतिक्रिया कॅप्टन कोहलीनं दिली आहे. कोरोना योद्ध्यांना श्रद्धांजली देशात कोरोनाची पहिली आणि दुसरी लाट असताना आपल्या जिवाची पर्वा न करता कोरोना योद्ध्यांनी काम केलं. यात शेकडो कोरोना योद्ध्यांना आपले प्राण गमवावे लागले. मात्र मागे न हटता आणि मृत्यूलाही न घाबरता या योद्ध्यांनी आपलं कर्तव्य चोख बजावलं. त्यांच्या कार्याला सलाम करण्यासाठी आणि मृत्यू झालेल्या सर्व योद्ध्यांना श्रद्धांजली देण्यासाठी आपण निळ्या रंगाची जर्सी घातल्याचं कोहलीनं म्हटलं आहे. हे वाचा -मोठी बातमी: भारतीय क्रिकेटपटूंना दिलासा, BCCI नं जाहीर केली भक्कम पगारवाढ! कोहलीसाठी खास सामना कॅप्टन विराट कोहलीसाठी हा सामना आणखी एका कारणासाठी खास आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या टीमसोबत विराट कोहली आपला 200 वा सामना खेळत आहे. एकाच लिगमध्ये, एकाच फ्रँचायझीसाठी 200 सामने खेळणारा विराट कोहली हा जगातील पहिला खेळाडू बनला आहे. अर्थात, आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने खेळण्याचा विक्रम मात्र महेंद्रसिंग धोनीच्या नावे आहे.
  Published by:desk news
  First published: