मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /RCBचा कॅप्टन डुप्लेसिस क्वालिफायर 2 अन् फायनलवेळी दिसणार नव्या भूमिकेत

RCBचा कॅप्टन डुप्लेसिस क्वालिफायर 2 अन् फायनलवेळी दिसणार नव्या भूमिकेत

फाफ डुप्लेसिस दिसणार वेगळ्या भूमिकेत

फाफ डुप्लेसिस दिसणार वेगळ्या भूमिकेत

आरसीबीचा संघ आयपीएल 2023च्या हंगामातून बाहेर पडला, पण संघाचा कर्णधार फाफ डुप्लेसि क्वालिफायर दोन आणि फायनलमध्ये वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे.

मुंबई, 26 मे : आयपीएल 2023च्या हंगामात आरसीबीच्या संघाला प्लेऑफमध्ये स्थान पटकावता आलं नाही. टॉप फोरमध्ये पोहोचण्याची संधी आरसीबीला होती. पण अखेरच्या सामन्यात त्यांना गुजरात टायटन्सने 6 विकेटने पराभूत केलं. या पराभवामुळे आरसीबीचे आयपीएलच्या प्लेऑफमध्ये पोहोचण्याचे स्वप्न भंगले. फाफ डुप्लेसिच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या आरसीबीला यावेळीही पुन्हा एकदा निराशेचा सामना करावा लागला. यंदाच्या हंगामात 38 वर्षीय फाफ डुप्लेसिने जबरदस्त कामगिरी केली. त्याने सलामीवीर विराट कोहलीसोबत चांगल्या भागिदारी करून संघाच्या विजयात मोठी भूमिका बजावली.

आरसीबीचा संघ आयपीएल 2023च्या हंगामातून बाहेर पडला, पण संघाचा कर्णधार फाफ डुप्लेसि क्वालिफायर दोन आणि फायनलमध्ये वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. तो मैदानात फलंदाजी करताना दिसणार नाही तर आपल्या आवाजाने सामन्याची रंगत वाढवणार आहे. डुप्लेसिस दोन सामन्यात स्टार स्पोर्ट्स एक्सपर्ट पॅनेलचा भाग बनणार आहे. या दोन सामन्यांवेळी तो कमेंट्री करणार आहे. या हंगामात मैदानावर चौकार षटकारांचा पाऊस पाडणारा डुप्लेसिस आता एक्सपर्ट म्हणून दोन महत्त्वाच्या सामन्यात समालोचन करताना दिसेल.

गुजरात की मुंबई, कोण गाठणार फायनल? पाहा IPLची आकडेवारी काय सांगते

डुप्लेसिसच्या नेतृत्वाखाली आरसीबीने यंदाच्या हंगामात 14 लीग सामन्यापैकी 7 सामन्यात विजय मिळवला. तर 7 सामने आरसीबीला गमवावे लागले. आरसीबीचे एकूण गुण 14 होते आणि गुणतालिकेत ते सहाव्या नंबरवर राहिले. डुप्लेसिसने 14 सामन्यात फलंदाजी करताना 8 अर्धशतकासह तब्बल 730 धावा केल्या.

डुप्लेसिसने 56.15 च्या सरासरीने धावा केल्या. यात त्याचा स्ट्राइक रेट 153.68 इतका होता. यंदाच्या हंगामात त्याने 60 चौकार आणि 36 षटकार मारले. याशिवाय तो एकदा नाबाद राहिला आहे. या हंगामातील दुसरा क्वालिफायर सामना 23 जूनला तर फायनल सामना 28 जूनला होणार आहे. दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात होणार आहे. यात विजय मिळवणारा संघ चेन्नई सुपर किंग्ज सोबत फायनलमध्ये खेळणार आहे. दोन्ही सामने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहेत.

First published:
top videos