IPL 2019 : चार वर्षांच्या पराभवाचा वचपा घेणार का कोहली?

कोहली आणि धोनी यांनी शनिवारी होणाऱ्या पहिल्या सामन्यासाठी सज्ज असून, त्यांच्या सरावाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

News18 Lokmat | Updated On: Mar 23, 2019 07:27 AM IST

IPL 2019 : चार वर्षांच्या पराभवाचा वचपा घेणार का कोहली?

चेन्नई, 22 मार्च : शनिवारपासून सुरु होत असलेल्या आयपीएलचे बारावे हंगाम माजी कर्णधार विरुद्ध सध्याचा कर्णधार यांच्यात रंगणार आहे. चेन्नईच्या होमग्राऊंडवर हा सामना होणार असल्यामुळे सध्या फ्रंटफुटवर असलेल्या धोनीच्या चेन्नईला हरवण्यासाठी विराटसेना सज्ज आहे. मात्र, 2014पासून धोनी विरोधात एकदाही सामना न जिंकणाऱ्या या विराटसाठी शनिवारी खरी कसोटी असणार आहे. याकरिता दोन्ही संघांनी कसून सराव करण्यास सुरूवात करण्यात आली आहे. या दोन्ही संघाच्या सरावसत्राचे फोटो नुकतेच सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर करण्यात आलं आहे.
 

Loading...

View this post on Instagram
 

Calm before the storm. #PlayBold #CSKvsRCB #IPL2019 #VIVOIPL2019 PC: @chennaiipl


A post shared by Royal Challengers Bangalore (@royalchallengersbangalore) on
 

View this post on Instagram
 

Cameradarie caught on the Camera diaries! #WhistlePodu #Yellove


A post shared by Chennai Super Kings (@chennaiipl) on

दोन वर्षांच्या बंदीची शिक्षा भोगून आल्यानंतर चेन्नईने गेल्या हंगामात सनराईजर्स हैदराबादवर मात केली होती. धोनीच्या चेन्नई सुपर किंगज संघाने आतापर्यंत 2010, 2011,2018 असे तीनवेळा आयपीएल चषक जिंकले आहे. त्यामुळे कोहलीसमोर मोठे आव्हान असले तरी, कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा गेल्या काही हंगामातला इतिहास फारसा चांगला नाही. त्यामुळे यंदाच्या हंगामात नवीन खेळाडूंसह धडाक्यात सुरुवात करण्याचा विराट कोहलीचा प्रयत्न असणार आहे.


VIDEO : भाजप प्रवेशाबाबत गौतम गंभीर म्हणतो...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 23, 2019 07:27 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...