Home /News /sport /

या क्रिकेट स्टेडियमला मिळालं रावळपिंडी एक्सप्रेस शोएब अख्तरचं नाव!

या क्रिकेट स्टेडियमला मिळालं रावळपिंडी एक्सप्रेस शोएब अख्तरचं नाव!

भारतामध्ये अजूनही कोणत्याच क्रिकेट स्टेडियमला क्रिकेटपटूचं नाव देण्यात आलेलं नाही, पाकिस्तानमध्ये असं झालं आहे. पाकिस्तानचा माजी फास्ट बॉलर शोएब अख्तरचं (Shoaib Akhtar) नाव स्टेडियमला देण्यात आलं आहे.

    रावळपिंडी, 13 मार्च : भारतामध्ये अजूनही कोणत्याच क्रिकेट स्टेडियमला क्रिकेटपटूचं नाव देण्यात आलेलं नाही, पाकिस्तानमध्ये असं झालं आहे. पाकिस्तानचा माजी फास्ट बॉलर शोएब अख्तरचं (Shoaib Akhtar) नाव स्टेडियमला देण्यात आलं आहे. रावळपिंडी (Rawalpindi) स्टेडियमचं नाव बदलून आता शोएब अख्तर स्टेडियम करण्यात आलं आहे. शोएब अख्तरने स्वत: या स्टेडियमचा फोटो शेयर केला आहे. 'रावळपिंडीच्या केआरएल स्टेडियमचं नाव बदलून शोएब अख्तर स्टेडियम करण्यात आलं आहे. माझ्यासाठी ही सन्मानाची गोष्ट आहे. यावर बोलण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. एवढ्या वर्षांपासून मला जे प्रेम आणि सन्मान मिळाला आहे, त्यासाठी सगळ्यांचे आभार,' असं ट्विट शोएब अख्तरने केलं आहे. 'पाकिस्तानचा झेंडा उंच राहावा, यासाठ मी पूर्ण निष्ठेने पाकिस्तानची सेवा केली. रोज मी छातीवर अभिमानाने पाकिस्तान क्रिकेटचा स्टार लावतो. धन्यवाद, पाकिस्तान जिंदाबाद,' असंही शोएब म्हणाला. याचसोबत शोएबने स्टेडियमचे दोन फोटोही शेयर केले. या फोटोवर शोएब अख्तर क्रिकेट स्टेडियम असं मोठ्या अक्षरात लिहिल्याचं दिसत आहे. शोएब अख्तर जगातला सगळ्यात जलद बॉल फेकणारा क्रिकेटपटू आहे. पाकिस्तानकडून त्याने 46 टेस्ट, 163 वनडे आणि 15 टी20 खेळल्या, यात त्याने टेस्टमध्ये 178 विकेट, वनडेमध्ये 247 आणि टी20 मध्ये 19 विकेट घेतल्या. टेस्ट क्रिकेटमध्ये त्याने 12 वेळा 5 विकेट आणि 2 वेळा 10 विकेट घेण्याचा रेकॉर्ड केला. भारतामध्ये सध्या 52 अशी स्टेडियम आहेत जिकडे कमीत कमी एक आंतरराष्ट्रीय मॅच खेळवण्यात आली. पण एकाही स्टेडियमला क्रिकेटपटूचं नाव देण्यात आलेलं नाही. दोन क्रिकेट स्टेडियमना माजी हॉकीपटूंची नावं देण्यात आली. याशिवाय दोन स्टेडियम इंग्रजांच्या नावानी आहेत. मुंबईचं ब्रेबॉर्न स्टेडियमचं (Brebourne Stadium) नाव गव्हर्नर लॉर्ड ब्रेबॉर्न यांच्या नावाने तर कानपूरच्या ग्रीन पार्कचं (Green Park) नाव ब्रिटीश लेडी मॅडम ग्रीनच्या नावाने ठेवण्यात आलं.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Cricket news, Pakistan, Shoaib akhtar

    पुढील बातम्या