मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /रवींद्र जडेजाच्या मते 'हा' खेळाडू आहे इंडियाचा फ्यूचर स्टार; सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट

रवींद्र जडेजाच्या मते 'हा' खेळाडू आहे इंडियाचा फ्यूचर स्टार; सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट

सध्या अनेक युवा खेळाडू आंतरराष्ट्रीय आणि डोमेस्टिक क्रिकेटमध्ये उत्तम खेळाचे प्रदर्शन करीत आहेत. अशातच रवींद्र जडेजाने सोशल मीडियावर एका युवा क्रिकेटर सोबत पोस्ट शेअर करत त्याला फ्यूचर स्टार असे म्हंटले आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 1 फेब्रुवारी : दुखापतीमुळे बऱ्याच काळ क्रिकेट पासून दूर राहिलेला भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा हा लवकरच ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघातुन पुनरागमन करणार आहे. तेव्हा जडेजा सध्या कसोटी मालिकेसाठी तयारी करीत असून त्याने नुकतेच रणजी ट्रॉफीतही आपल्या दमदार खेळाचे प्रदर्शन दाखवले होते.

हे ही वाचा  : IND VS NZ : पृथ्वी शॉ करणार शुभमन गिलला रिप्लेस? तिसऱ्या सामन्यासाठी टीम इंडियात होणार मोठे बदल

सध्या अनेक युवा खेळाडू आंतरराष्ट्रीय आणि डोमेस्टिक क्रिकेटमध्ये उत्तम खेळाचे प्रदर्शन करीत आहेत. अशातच रवींद्र जडेजाने सोशल मीडियावर एका युवा क्रिकेटर सोबत पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये जडेजाने 20 वर्षीय क्रिकेटर तिलक वर्मा याच्यासोबत सेल्फी शेअर केला असून त्याला इंडियाचा फ्यूचर स्टार म्हणून संबोधले आहे. जडेजाने फोटोला, 'चिलिंग विथ द फ्युचर ऑफ इंडिया.' असे कॅप्शन दिले आहे.

कोण आहे तिलक वर्मा?

तिलक वर्मा हा 20 वर्षीय युवा क्रिकेटर असून तो हैद्राबाद संघाकडून देशांतर्गत क्रिकेट खेळतो. 2022 मध्ये तिलक आयपीएल मधील मुंबई इंडियन्स कडून खेळला होता. त्यावेळी त्याने पदार्पणात आपल्या धडाकेबाज फलंदाजीने सर्वांना प्रभावित केले.

तिलकने गेल्या वर्षी 14 आयपीएल सामन्यांमध्ये दोन अर्धशतकांच्या मदतीने एकूण 397 धावा केल्या होत्या. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 131 होता. त्याची आयपीएलमधील सर्वोत्तम धावसंख्या 61 धावा आहे.

First published:

Tags: Cricket, Cricket news, India vs Australia, Ravindra jadeja