मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Ravindra Jadeja: जाडेजानं सीएसकेशी संपर्क तोडला? आगामी आयपीएलमध्ये रवींद्र जाडेजा वेगळ्या जर्सीत?

Ravindra Jadeja: जाडेजानं सीएसकेशी संपर्क तोडला? आगामी आयपीएलमध्ये रवींद्र जाडेजा वेगळ्या जर्सीत?

रवींद्र जाडेजा

रवींद्र जाडेजा

Ravindra Jadeja: 2022 च्या आयपीएल मोसमात जाडेजा आणि सीएसके फ्रँचायझीमध्ये सुरु झालेला वाद आता वाढत असल्याचं बोललं जातंय. कारण गेल्या आयपीएल मोसमापासून जाडेजा आणि सीएसकेमध्ये कोणताही संपर्क झाला नसल्याची माहिती आहे. त्यामुळे आगामी आयपीएलमध्ये जाडेजा वेगळ्या जर्सीत दिसण्याची शक्यता आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 16 ऑगस्ट: टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजा सध्या आशिया चषकाची तयारी करतोय. पण आयपीएल फ्रँचायझी चेन्नई सुपर किंग्स आणि रवींद्र जाडेजामध्ये मोठी दरी निर्माण झाली आहे. 2022 च्या आयपीएल मोसमात जाडेजा आणि सीएसके फ्रँचायझीमध्ये सुरु झालेला वाद आता वाढत असल्याचं बोललं जातंय. कारण गेल्या आयपीएल मोसमापासून जाडेजा आणि सीएसकेमध्ये कोणताही संपर्क झाला नसल्याची माहिती आहे. त्यामुळे आगामी आयपीएलमध्ये जाडेजा वेगळ्या जर्सीत दिसण्याची शक्यता आहे. जाडेजा-सीएसके वाद आयपीएलच्या 15व्या मोसमात चेन्नईनं धोनीकडून नेतृत्वाची धुरा रवींद्र जाडेजाकडे सोपवली. धोनी आणि सुरेश रैनानंतर चेन्नईचं कर्णधारपद भूषवणारा तो तिसराच खेळाडू ठरला. पण जाडेजाच्या नेतृत्वात संघाची कामगिरी लौकिकास साजेशी नव्हती. त्यामुळे संघव्यवस्थापनानं पुन्हा धोनीकडेच संघाची कमान सोपवली. मिळालेल्या माहितीनुसार याच कारणामुळे चेन्नई सुपर किंग्स आणि जाडेजामधल्या या वादाची ठिणगी पडली. नंतरच्या काही सामन्यात दुखापतीच्या कारणानं जाडेजा काही सामने संघाबाहेर राहिला. आणि संघव्यवस्थापन आणि जाडेजामधल्या वादाची चर्चा आणखी वाढली. सोशल मीडियातून पोस्ट हटवल्या जाडेजानं गेल्या आयपीएलपासून सीएसकेच्या अनेक पोस्ट आपल्या सोशल मीडिया अकाऊंट्सवरुन हटवल्या आहेत. सीएसकेनं टॅग केलेल्या अनेक पोस्टना त्यानं कोणताही प्रतिसाद दिलेला नाही. दरम्यान 2023 च्या आयपीएल मोसमात महेंद्रसिंग धोनी खेळणार असल्याचं त्यानं आधीच जाहीर केलं आहे. त्यामुळे धोनीच चेन्नईचं नेतृत्व करेल. त्यामुळे पुन्हा कर्णधार म्हणून जाडेजा संघात येणं शक्य नाही. अष्टपैलू म्हणून तो संघात खेळू शकतो पण त्यासाठी सीएसके आणि त्याच्यामधली वाढलेली दरी कमी होणं गरजेचं आहे. हेही वाचा - Football: फिफाच्या निर्णयामुळे भारतीय फुटबॉलचं भविष्य अंधारात, महिला U-17 विश्वचषकाचं यजमानपदही जाणार? धोनीच्या नेतृत्वात जाडेजाची भरारी रवींद्र जाडेजा आतापर्यंत चार आयपीएल फ्रँचायझींकडून खेळला आहे. पण सर्वात जास्त यशस्वी ठरला तो चेन्नई सुपर किंग्समध्ये. जाडेजा 2012 ते 2015 आणि 2018 ते 2022 अशा 9 मोसमात त्यानं चेन्नईचं प्रतिनिधित्व केलं आहे. आयपीएलमधल्या त्याच्या कामगिरीवर नजर टाकली तर त्याच्या खात्यात 2502 धावा आणि 132 विकेट्स जमा आहेत.
    Published by:Siddhesh Kanase
    First published:

    Tags: Csk, Ravindra jadeja

    पुढील बातम्या