Home /News /sport /

जडेजाची दरियादिली! कायमच भारताची खिल्ली उडवणाऱ्या खेळाडूला दिली आपली जर्सी, कारण आहे खास

जडेजाची दरियादिली! कायमच भारताची खिल्ली उडवणाऱ्या खेळाडूला दिली आपली जर्सी, कारण आहे खास

जडेजाने दाखवलं मोठं मन

जडेजाने दाखवलं मोठं मन

टीम इंडियाचा ऑलराऊंडर रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) याने पुन्हा एकदा स्वत:चं मोठं मन दाखवलं आहे.

    लंडन, 30 ऑगस्ट : टीम इंडियाचा ऑलराऊंडर रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) याने पुन्हा एकदा स्वत:चं मोठं मन दाखवलं आहे. इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन (Michael Vaughan) नेहमीच सोशल मीडियावरून टीम इंडियाची खिल्ली उडवत असतो, यामुळे त्याला अनेकवेळा भारतीयांच्या रोषाचा सामना करावा लागतो, पण याच मायकल वॉनला रविंद्र जडेजाने आपली टेस्ट जर्सी दिली आहे. या जर्सीवर भारतीय टीमच्या सगळ्या खेळाडूंची स्वाक्षरी आहे. जडेजाने चॅरिटीसाठी ही जर्सी दिली होती. मायकल वॉनने जडेजाला धन्यवाद देत इन्स्टाग्राम स्टोरीवर जर्सीचा फोटो शेयर केला. 'चियर्स रविंद्र जडेजा, या चॅरिटीमधून खूप पैसे मिळतील,' असं मायकल वॉन म्हणाला. जडेजा इंग्लंडमधल्या टेस्ट सीरिजच्या (India vs England) पहिल्या तिन्ही मॅच खेळला आहे. 5 टेस्ट मॅचची ही सीरिज सध्या 1-1 ने बरोबरीत आहे. तिसऱ्या टेस्टनंतर जडेजाला दुखापत झाल्यामुळे त्याचं चौथ्या टेस्टमध्ये खेळणं कठीण आहे. लीड्स टेस्टवेळी जडेजाच्या गुडघ्याला दुखापत झाली, त्यामुळे त्याला रुग्णालयात स्कॅनिंगसाठी नेण्यात आलं. तिसऱ्या टेस्टच्या पहिल्या दिवशी जडेजा फिल्डिंग करताना घसरला होता, यानंतर गुडघ्याला लागल्यामुळे तो ड्रेसिंग रूममध्येही गेला होता. दुसऱ्या इनिंगमध्ये जडेजाने 30 रनची खेळी केली, पण मॅचमध्ये भारताचा इनिंग आणि 76 रनने पराभव झाला.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: India vs england, Ravindra jadeja

    पुढील बातम्या