मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

जडेजाने पत्नीसोबत केलं अभिमानास्पद काम, तुम्हीही सलाम कराल!

जडेजाने पत्नीसोबत केलं अभिमानास्पद काम, तुम्हीही सलाम कराल!

आपल्या खेळानं देशाची शान वाढवणारे अनेक खेळाडू आपल्या कामानं लोकांच्या कौतुकाला पात्र ठरत आहेत. यामध्ये सध्या चर्चा आहे ती क्रिकेटपटू रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) आणि त्याची पत्नी रीवा (Riva Jadeja) यांच्या मदतकार्याची.

मुंबई, 9 जून : सध्याच्या कोरोना संकटानं (Coronavirus Pandemic) सगळ्या देशाला वेठीला धरलं आहे. लॉकडाउनमुळे अनेक व्यवसाय बंद पडले आहेत. असंख्य लोक बेरोजगार झाले आहेत. जगायचं कसं असा प्रश्न लाखो लोकांसमोर उभा राहिला आहे. अशा या विपरीत परिस्थितीत मदतीचे हजारो हातही पुढे येत आहेत. सामान्य माणसांपासून ते दिग्गज व्यक्तींपर्यंत लोक आपल्याला जशी जमेल तशी मदत करत आहेत. कोणी अन्नधान्य देत आहेत, तर कोणी पैसे देत आहेत. याशिवाय अनेक पद्धतीनं लोक मदत करत आहेत.

भारतीय क्रिकेटरही यात मागे नाहीत. आपल्या खेळानं देशाची शान वाढवणारे अनेक खेळाडू आपल्या कामानं लोकांच्या कौतुकाला पात्र ठरत आहेत. यामध्ये सध्या चर्चा आहे ती क्रिकेटपटू रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) आणि त्याची पत्नी रीवा (Riva Jadeja) यांच्या मदतकार्याची. ऑलराऊंडर असणारा रवींद्र जडेजा मैदानाबाहेरही तशीच कामगिरी करतो आहे.

सध्या रवींद्र जडेजा इंग्लंड (England) दौऱ्यावर असून सोबत त्याची पत्नी आणि मुलगी निध्यानाही आहे. नुकताच निध्याना हिचा चौथा वाढदिवस साजरा करण्यात आला. यानिमित्तानं त्यानं आणि त्याच्या पत्नीनं पाच गरीब कुटुंबांना आर्थिक मदत केली आहे. या कुटुंबातील मुलींच्या नावानं पोस्टात बचत खाती उघडण्यात आली असून, त्यात प्रत्येकी दहा हजार रुपये जमा करण्यात आले आहेत. रवींद्र जडेजा आणि त्याच्या पत्नीनं दहा हजार गरीब मुलींची मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. रीवानं व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून या मुलींना पासबुक प्रदान करण्याच्या कार्यक्रमाला हजेरी लावली.

2016 मध्ये रवींद्र जडेजा आणि रीवा यांचा विवाह झाला. राजकीय घराण्याशी संबंध असणाऱ्या रीवानं दोन वर्षापूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला असून, आपल्या पतीसह तिनं पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचीही भेट घेतली होती. मेकॅनिकल इंजिनीअर असणारी रीवा समाजकार्यातही नेहमीच सक्रीय असते. या आधी आपल्या वाढदिवसानिमित्त तिनं नेत्रदानाचा निर्णय घेतला होता. सध्या ती जडेजा कुटुंबाच्या जड्डूज फूड फिल्ड या रेस्टॉरंटचा कारभार सांभाळते. रवींद्र जडेजा आणि रीवा यांच्या गरीब कुटुंबाना विशेषतः मुलींना आर्थिक मदत करण्याच्या पुढाकाराचं सर्वत्र कौतुक होत असून, सोशल मीडियावरही त्यांचं लोक सलाम करत आहेत.

दरम्यान, इंग्लंडमध्ये असलेला रवींद्र जडेजा आगामी स्पर्धेसाठी कसून तयारी करत आहे. न्यूझीलंडविरुद्ध (India vs New Zealand) होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलवर (World Test Championship Final) त्यानं लक्ष केंद्रित केलं आहे. आयपीएलमध्ये (IPL) जडेजा चेन्नई सुपरकिंग्जकडून (CSK) खेळतो.

First published:

Tags: Ravindra jadeja, Team india