CSK च्या विजयानंतर विजयाचा शिल्पकार ठरलेल्या रवींद्र जडेजानं मॅचनंतर जे केलं ते त्याच्या फॅन्सना भलतंच आवडलं. रविवारी जागतिक कन्या दिन (World Daughter Day) होता.
या पार्श्वभूमीवर धोनीच्या टीममधल्या या खेळाडूनं आपलं `मॅन ऑफ द मॅच` हे अॅवॉर्ड त्याच्या मुलीला समर्पित केलं. याबाबतची छायाचित्रं सीएसकेनं त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून शेअर केली. या छायाचित्रांमध्ये जडेजा त्याची मुलगी निध्यानासोबत उभा असल्याचं दिसत आहे. परंतु, या दोघांमध्ये काचेचं दार आहे. या छायाचित्राखाली एक हृदयस्पर्शी कॅप्शन देण्यात आली आहे. त्यात लिहिलं होतं, की `हे तुझ्यासाठी निध्याना.` जडेजानं 19व्या ओव्हरमध्ये प्रसिद्ध कृष्णाला 2 फोर आणि 2 सिक्सर्स मारत 21 रन्स काढले (ओव्हरमध्ये 22 रन्स) आणि तिथूनच मॅच पालटली.
जडेजानं `मॅन ऑफ दी मॅच अॅवॉर्ड` जिंकल्यानंतर बोलताना सांगितलं, की `हे मुश्किल आहे. तुम्ही 5 महिन्यांपासून टेस्ट क्रिकेट खेळत असाल आणि अचानक तुम्हाला मर्यादित क्रिकेट खेळावं लागत असेल तर हे खरोखरच अवघड आहे. नेट्समध्ये मी बॅटिंग करत होतो. त्यामुळे मी जे काही नेट्समध्ये केलं आहे, तेच मॅचमध्ये करण्याचा प्रयत्न करील, असा विचार करत होतो. शेवटच्या ओव्हरमध्ये मला जे रन्स मिळाले ते विकेट्सपेक्षा जास्त महत्त्वाचे आहेत. कारण त्यामुळेच आम्ही विजय संपादन करू शकलो.` आयपीएल 2021च्या सीझनमध्ये आतापर्यंत रवींद्र जडेजानं बॅट्समन आणि बॉलर म्हणून चांगली कामगिरी केली आहे. त्याने 10 मॅचेसमध्ये 179 रन्स काढले असून, 7 विकेट्स घेतल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Csk, IPL 2021, Ravindra jadeja