मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

ऑफ स्पिनर आर अश्विनची Inside Story, बॉलरने सांगितली 20 वर्षापूर्वीची जुनी गोष्ट

ऑफ स्पिनर आर अश्विनची Inside Story, बॉलरने सांगितली 20 वर्षापूर्वीची जुनी गोष्ट

r ashwin

r ashwin

अश्विनने कसोटी संपल्यानंतर बीसीसीआय टीव्हिवर बोलताना आपली इनसाइड स्टोरी (Was inspired by Harbhajan's famous spell against Australia in 2001)सांगितली आहे.

  • Published by:  Dhanshri Otari

नवी दिल्ली, 30 नोव्हेंबर: भारतीय संघाला पाचव्या दिवसाच्या अखेरच्या षटकापर्यंत न्यूझीलंडच्या(IND vs NZ) तळाच्या फलंदाजांनी झुंजवले. राचिन रविंद्रनं 15 षटकं खेळून काढताना किवींचा पराभव टाळला अन् टीम इंडियाला अनिर्णीत निकालावर समाधान मानण्यास भाग पाडले. पण चर्चा क्रिकेट जगतात चर्चा सुरू आहे ती म्हणजे ऑफ स्पिनर आर अश्विनची(Ravichandran Ashwin). अश्विन हरभजन सिंगला (417 बळी) मागे टाकून या कसोटीत कसोटीत सर्वाधिक विकेट घेणारा अश्विन तिसरा भारतीय ठरला आहे. दरम्यान, अश्विनने कसोटी संपल्यानंतर बीसीसीआय टीव्हिवर बोलताना आपली इनसाइड स्टोरी (Was inspired by Harbhajan's famous spell against Australia in 2001)सांगितली आहे.

न्यूझीलंडचा सलामीवीर टॉम लॅथमला बाद करताच त्याने ही कामगिरी केली. त्याच्याकडे आता 80 कसोटीत 419 विकेट्स आहेत.

कानपूर कसोटी संपल्यानंतर श्रेयस अय्यरने बीसीसीआय टीव्हीवर आर अश्विनशी त्याच्या कामगिरीबद्दल संवाद साधला. यावेळी ऑफस्पिनर म्हणाला, 'ही फक्त संख्या आहे, जे माझ्या प्रयत्नांमुळे साध्य होत आहे. मी माझ्या खेळाचा आनंद घेण्याचा प्रयत्न करत आहे. मी किती विकेट्स ओलांडत आहे याची मला चिंता नाही. ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. तू भारतासाठी खेळ, माझी 200वी विकेट याच मैदानावर होती आणि आता मी कानपूरमध्येच हरभजन सिंगला मागे टाकले आहे.

मी हरभजन सिंहमुळे...

अश्विन पुढे म्हणाला, “जेव्हा हरभजन सिंगने 2001 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत ऐतिहासिक गोलंदाजी केली होती. तेव्हा एक दिवस ऑफस्पिनर होईन असे वाटले नव्हते. मी त्याच्याकडून प्रेरित होतो आणि आज इथे आहे. मी पहिला फलंदाज होतो ही कथा अनेकांना माहीत असेल. पण 2001 च्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीनंतर मी फिरकी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अशी माझी सुरुवात झाली. मला माहित नाही की मी आता हरभजनची शैली कॉपी करू शकेन की नाही."

'कानपूर कसोटी न जिंकल्याने निराश'

कानपूर कसोटी अनिर्णित राहिल्याबद्दल अश्विन म्हणाला, “मला हळूहळू जाणीव होत आहे की आपण कसोटी जिंकू शकलो नाही. एवढ्या जवळ येऊनही आम्ही दूरच राहिलो. त्यावर मात करणे माझ्यासाठी थोडे कठीण आहे. जमैकामध्ये यापूर्वीही असे घडले आहे. एक गोलंदाज म्हणून मला यातून बाहेर यायला थोडा वेळ लागेल." अशी भावना अश्विनने यावेळी व्यक्त केली.

शेवटच्या दिवशी भारताला कानपूर कसोटी जिंकण्यासाठी 9 विकेट्सची गरज होती. पण टीम इंडियाला फक्त 8 विकेट घेता आल्या. पदार्पण करणाऱ्या रचिन रवींद्र आणि एजाज पटेल यांनी सामना अनिर्णित राखण्यात मोठी भूमिका बजावली. रचिनने 91 चेंडू खेळले, तर एजाजने 23 चेंडूंचा सामना केला. शेवटच्या विकेटसाठी या जोडीने एकूण 52 चेंडूंचा सामना केला.

First published:

Tags: BCCI, R ashwin