BCCIच्या लोगोनं केला दिग्गज क्रिकेटपटूचा घात, झाली मोठी कारवाई

BCCIच्या लोगोनं केला दिग्गज क्रिकेटपटूचा घात, झाली मोठी कारवाई

विजय हजारे करंडक स्पर्धेत (Vijay Hazare Trophy) चौथ्यांदा कर्नाटक संघानं बाजी मारली.

  • Share this:

तमिळनाडू, 25 ऑक्टोबर : विजय हजारे करंडक स्पर्धेत (Vijay Hazare Trophy) चौथ्यांदा कर्नाटक संघानं बाजी मारली. अंतिम सामन्यात तमिळनाडू संघावर केएल राहुल आणि मयंक अग्रवाल हे दोन खेळाडू भारी पडले. दोघांनी आक्रमक फलंदाजी करत संघाला विजय मिळवून दिला. पहिले फलंदाजी करताना तमिळनाडू संघानं 49.5 ओव्हरमध्ये 252 धावा केल्या.

तमिळनाडू संघाने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना मयंक आणि केएलनं 112 धावांनी भागिदारी केली आणि हे आव्हान पार केले. दरम्यान या सामन्यात एक वेगळ प्रकार घडला. भारतीय संघाचा फिरकी गोलंदाज आर अश्विनवर बीसीसीआयचा लोगो असलेली जर्सी वापरल्यामुळं कारवाई केली जाणार आहे. विजय हजारे स्पर्धेत तमिळनाडू संघाकडून खेळणारा अश्विननं तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यास उतरला. त्यावेळी त्याच्या हेल्मेटवर बीसीसीआयचा लोगो होता. ही एक चूक अश्विनला महागात पडणार आहे.

या सामन्यातील रेफ्री चिन्मय शर्मा यांनी अश्विनवर ही कारवाई केली आहे. अश्विनवर बीसीसीआयनं लगावलेला कपड्यांच्या नियमांचे उल्लंखन केले आहे. शर्मा यांनी अश्विनच्या नियमाबाबत सांगताना, “बीसीसीआयच्या नियमांनुसार राष्ट्रीय संघाचा हेल्मेट स्थानिक क्रिकेटमध्ये वापरण्याची परवानगी नाही आहे. जर वापरल्यास बीसीसीआयचा लोगो लपवावा लागतो. खेळाडूंना ही माहिती याआधी देण्यात आली होती. मात्र अश्विननं केलेल्या या चुकीची शिक्षा मिळू शकते”, असे स्पष्टीकरण दिले. दरम्यान कर्नाटककडून खेळणाऱ्या मयंक अग्रवाल आणि लोकेश राहुल यांनीही बीसीसीआयचा लोगो असलेला हेल्मेट वापरला होता, मात्र त्यांनी टेपनं हा लोगो लपवला होता.

अभिमन्यू मिथूनच्या गोलंदाजीपुढे टिकू शकला नाही तमिळनाडूचा संघ

कर्नाटकचा जलद गोलंदाज अभिमन्यू मिथूननं तमिळनाडूच्या फलंदाजांना मैदानावर टिकू दिले नाही. मिथूननं हॅट्रिकसह पाच विकेट घेतल्या. महत्त्वाची गोष्ट म्हणजे मिथूनचा आज 30वा वाढदिवस आहे. त्यामुळं वाढदिवसाच्या दिवशीच हॅट्रिक घेण्याचा इतिहास मिथूननं केला आहे. मुरली विजय, विजय शंकर, शाहरुख खान, एम मोहम्मद आणि मुरुगन अश्विन यांना मिथूननं बाद केले.

Published by: Priyanka Gawde
First published: October 25, 2019, 8:21 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading