मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /ICC Test Player Of The Year: अश्विन बेस्ट खेळाडूच्या रेसमध्ये, या खेळाडूंशी टक्कर!

ICC Test Player Of The Year: अश्विन बेस्ट खेळाडूच्या रेसमध्ये, या खेळाडूंशी टक्कर!

भारताचा स्पिनर आर.अश्विन (R Ashwin) 2021 या वर्षाचा टेस्टचा सर्वोत्तम खेळाडू बनू शकतो. आयसीसीने मंगळवारी 4 खेळाडूंची यादी (ICC Test Player of The Year) केली आहे, यात अश्विनशिवाय इंग्लंडचा कर्णधार जो रूट (Joe Root) याचाही समावेश आहे.

पुढे वाचा ...

दुबई, 28 डिसेंबर : भारताचा स्पिनर आर.अश्विन (R Ashwin) 2021 या वर्षाचा टेस्टचा सर्वोत्तम खेळाडू बनू शकतो. आयसीसीने मंगळवारी 4 खेळाडूंची यादी (ICC Test Player of The Year) केली आहे, यात अश्विनशिवाय इंग्लंडचा कर्णधार जो रूट (Joe Root) याचाही समावेश आहे. पुढच्या महिन्यात विजेत्या खेळाडूची घोषणा करण्यात येणार आहे.

अश्विनने या वर्षी 8 टेस्ट मॅचमध्ये 16 च्या सरासरीने 52 विकेट घेतल्या. याशिवाय त्याने 28 च्या सरासरीने 337 रनही केल्या, यात एका शतकाचा समावेश आहे. अश्विनने वर्षाच्या सुरुवातीला सिडनी टेस्टमध्ये हनुमा विहारीसोबत नाबाद पार्टनरशीप करत भारताचा पराभव टाळला होता. या कारणामुळे भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धची सीरिज 2-1 ने जिंकली होती. अश्विनने 128 बॉलमध्ये नाबाद 29 रन केले होते. तर इंग्लंडविरुद्ध भारतात झालेल्या सीरिजमध्ये अश्विनला 32 विकेट मिळाल्या होत्या, तसंच त्याने 189 रनही केल्या होत्या. काहीच दिवसांपूर्वी न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मैदानात झालेल्या सीरिजच्या 2 सामन्यांमध्ये त्याने 14 विकेट पटकावल्या.

रूटने केल्या 1,708 रन, 6 शतकं

इंग्लंडचा कर्णधार जो रूटने यावर्षी टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक रन केले. त्याने 15 टेस्टमध्ये 1708 रन केले, यात 6 शतकांचा समावेश आहे. याचसह तो क्रिकेट इतिहासात टेस्टमध्ये सर्वाधिक रन करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. जो रूटने एवढ्या रन केल्या असल्या तरी इंग्लंडची कामगिरी मात्र निराशाजनक झाली. मंगळवारी ऍशेस टेस्टमध्ये इंग्लंडचा लागोपाठ तिसरा पराभव झाला. याचसह त्यांनी सीरिजही गमावली. जो रूटने चेन्नईमध्ये भारताविरुद्ध 218 रनची खेळी केली होती.

जेमिसन-करुणारत्नेही रेसमध्ये

अश्विन आणि रूटशिवाय न्यूझीलंडचा फास्ट बॉलर काईल जेमिसन (Kyle Jamieson) आणि श्रीलंकेच्या टेस्ट टीमचा कर्णधार दिमुथ करुणारत्नेही (Dimuth Karunaratne) आयसीसीच्या या यादीत आहे. जेमिसनने यावर्षी 5 टेस्टमध्ये 18 च्या सरासरीने 27 विकेट घेतल्या, तसंच 105 रनही केल्या. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलच्या पहिल्या इनिंगमध्ये जेमिसनने भारताच्या 5 विकेट घेतल्या होत्या. तसंच न्यूझीलंडने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलही जिंकली होती. करुणारत्नेने 7 टेस्टमध्ये 69 च्या सरासरीने 902 रन केल्या, ज्यात 4 शतकांचा समावेश आहे.

First published:
top videos

    Tags: Icc, R ashwin