क्रिकेट पाहणंही सोडलेल्या खेळाडूची कमाल, दिग्गजांनाही टाकलं मागे

क्रिकेट पाहणंही सोडलेल्या खेळाडूची कमाल, दिग्गजांनाही टाकलं मागे

भारताने पहिला डाव 502 धावांवर घोषित केल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 431 धावांवर संपुष्टात आला. फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने एकाच डावत सात गडी बाद केले.

  • Share this:

विशाखापट्टणम, 05 ऑक्टोबर : बराच काळ कसोटी क्रिकेटपासून दूर राहिलेल्या रविचंद्रन अश्विनने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात जबरदस्त कामगिरी केली. अश्विनने पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी अश्विनने पाच गडी बाद केले. त्यानंतर चौथ्या दिवशी दोन गडी बाद करून आफ्रिकेचा डाव संपुष्टात आणला.

अश्विनने सर्वाधिक 46.2 षटके गोलंदाजी करताना 145 धावा देत 7 गडी बाद केले. यामध्ये 11 षटके निर्धाव टाकली. अश्विनसाठी ही कसोटी खास ठरली. त्याने शेवटचा कसोटी सामना जानेवारी 2018 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला होता. दहा महिन्यांनी कसोटीत उतरताना त्यानं कमाल केली.

कसोटीमध्ये अश्विनने आतापर्यंत 27 वेळा एका डावात पाच विकेट घेण्याची कामगिरी केली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाचव्यांदा त्याने पाच विकेट घेतल्या आहेत. त्याने हरभजन सिंग आणि जवागल श्रीनाथ यांना मागे टाकलं आहे. या दोघांनीही आफ्रिकेविरुद्ध प्रत्येकी चार वेळा पाच गडी बाद करण्याची कामगिरी केली आहे.

भारताने चौथ्या दिवशी केशव महाराज आणि कसिगो रबाडा यांना बाद करून दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 431 धावांवर संपुष्टात आणला. भारताने पहिल्या डावात 71 धावांची आघाडी घेतली. दक्षिण आफ्रिकेकडून डीन एल्गरने 160 धावा आणि क्विंटन डी कॉकने 111 धावांची खेळी केली. याशिवाय कर्णधार फाफ डु प्लेसीने अर्धशतक केलं.

VIDEO: मोजत बसा! उमेदवारी अर्ज भरण्यासाठी घेऊन आला 10 रुपयांचे चिल्लर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: r ashwin
First Published: Oct 5, 2019 01:05 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading