अखेर शास्त्रींनी सोडवला चौथ्या क्रमांकाचा तिढा, 'या' खेळाडूचं नाव फिक्स!

अखेर शास्त्रींनी सोडवला चौथ्या क्रमांकाचा तिढा, 'या' खेळाडूचं नाव फिक्स!

पुन्हा मुख्य प्रशिक्षकपदी विराजमान झालेल्या रवी शास्त्रींना सांगितला चौथ्या क्रमांकाचा खरा दावेदार.

  • Share this:

त्रिनीदाद, 18 ऑगस्ट : वर्ल्ड कपमध्ये मधल्या फळीच्या बेजबाबदार कामगिरीमुळं भारतीय संघाला सेमीफायनलमध्ये पराभव सहन करावा लागला. दरम्यान या पराभवानंतरही भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून रवी शास्त्री यांची निवड करण्यात आली. दरम्यान प्रशिक्षक झाल्यानंतर शास्त्री यांनी भारतीय संघाची महत्त्वाचा प्रश्न सोडवला. तो म्हणजे भारतीय संघात कोण करणार चौथ्या क्रमांकावर फलंदाजी?

विराटसेनेनं वेस्ट इंडिजविरुद्ध टी20 पाठोपाठ वनडे मालिकाही भारताने जिंकली. मात्र, या सामन्यातही विकेटकिपर फलंदाज ऋषभ पंतला चांगली कामगिरी करता आली नाही. त्यामुळं ऋषभ पंतच्या खेळीवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. कारण त्रिनिदादमध्ये झालेल्या तिसऱ्या सामन्यात पंत पहिल्याच चेंडूवर खातंही न उघडताच बाद झाला. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातही पंत 20 धावा करत बाद झाला होता. तिसऱ्या सामन्यात शिखर धवन बाद झाल्यानंतर क्रिझवर आलेल्या पंतनं पहिल्याच चेंडूवर मोठा शॉट मारण्याचा प्रयत्न केला आणि बाद झाला. त्यामुळं पंतचे चौथ्या क्रमांकाचे स्थान धोक्यात आले आहे.

रवी शास्त्रींनी सांगितले खऱ्या दावेदाराचे नाव

पुन्हा एकदा भारताच्या प्रशिक्षकपदी आलेल्या रवी शास्त्री यांनी टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत चौथ्या क्रमांकाच्या योग्य दावेदाराचे नाव सांगितले. यावेळी शास्त्री यांनी, “गेल्या दोन वर्षांपासून मी युवा खेळाडूंना जास्तीत जास्त संधी देत आहे. श्रेयस अय्यर सारखा फलंदाज हा चौथ्या क्रमांकासाठीच बनला आहे. आणखीही युवा फलंदाज आहेत, जे या जागेसाठी योग्य आहेत. मात्र सध्या श्रेयस अय्यर हा योग्य फलंदाज आहे”, असे सांगितेल.

कोहलीनं केली होती ऋषभ पंतची पाठराखण

भारतीय संघानं वर्ल्ड कपपासून चौथ्या क्रमांकासाठी वेगवेगळ्या फलंदाजांना संधी दिली आहे. अंबाती रायडू योग्य फलंदाज असताना त्याला वर्ल्ड कप संघात स्थान मिळाले नाही. त्यानंतर केएल राहुलनं सराव सामन्यात चौथ्या क्रमांकावर फलंदाजी केली. विजय शंकरला चौथ्या क्रमांकावर कमाल करता आली नाही. त्यानंतर ऋषभ पंतला संघात स्थान देण्यात आले. मात्र बेजबाबदार खेळीमुळं त्याचा पत्ता संघातून कट होऊ शकतो.

वाचा-रनमशीनची नाबाद 11 वर्ष! केवळ 12 धावा करत केली टीम इंडियात एण्ट्री

गावसकरही म्हणतात चौथ्या क्रमांकासाठी अय्यरचं बेस्ट!

भारचीय संघाचे माजी फलंदाज सुनील गावसकर यांनी चौथ्या क्रमांकावर श्रेयस अय्यरची उत्तम असल्याचे मत व्यक्त केले. तर, ऋषभ पंतहा महेंद्रसिंग धोनीसारखा पाचव्या किंवा सहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येऊ शकतो. तसेच, श्रेयस अय्यर हा चौथ्या क्रमांकाचा योग्य दावेदार असल्याचे त्यांनी सांगितले.

विराटनं केले अय्यरचे कौतुक

श्रेयस अय्यरच्या खेळीचं विराट कोहलीनं कौतुक केलं. भारताच्या आघाडीच्या फळीतील एखादा तरी फलंदाज मोठी खेळी करतो. पण या सामन्यात रोहित-धवन लवकर बाद झाले त्यानंतर मोठी खेळी करणं आणि संघाचा डाव सावरणं गरजेचं होतं. श्रेयसचा आत्मविश्वास चांगला आहे. त्याला कधी सिंगल-डबल घ्यायची आणि कधी मोठे फटके मारायचे हे माहिती आहे. त्याच्या फलंदाजीनं माझं काम सोपं झाल्याचं विराट कोहली म्हणाला.

चौथ्या क्रमांकावर पंत असफल

आतापर्यंत अनेकवेळा पंतनं त्याला मिळालेली संधी गमावली आहे. वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये, टी20 मालिकेत आणि दुसऱ्या सामन्यातही पंत चुकीच्या फटक्यामुळं बाद झाला. त्यानं मोक्याच्या क्षणी विकेट गमावली. पंतने गेल्या दोन्ही सामन्यात विकेट गमावल्यानंतर श्रेयस अय्यरनं जबरदस्त खेळी केली. मिळालेल्या संधीचा फायदा उठवत त्यानं दोन्ही सामन्यात अर्धशतकी खेळी केली.

वाचा-'स्मिथला अजून टार्गेट केलं तर आश्चर्य नाही', पाँटिंगला झाली 2005 ची आठवण

पंतची सरासरी केवळ 25.44

पंतनं आतापर्यंत 11 एकदिवसीय सामन्यात 9 डावात 25.44च्या सरासरीनं फलंदाजी करत 229 धावा केल्या आहेत. एकदिवसीय क्रिकटमध्ये त्याची 48 ही सर्वोत्कृष्ट खेळी राहिली आहे. तर, त्याचा स्ट्राईक रेटहा 97.03 आहे. दुसरीकडे पंतनं 18 टी-20 सामन्यात 21.57च्या सरासरीनं 302 धावा केल्या आहेत. यात 65 ही त्याची सर्वोत्कृष्ट खेळी राहिली आहे.

श्रेयसच्या नावावर 6 डावांत 3 अर्धशतक

श्रेयस अय्यरनं आपल्या शानदार खेळीच्य़ा जोरावर 8 एकदिवसीय सामन्यात तीन अर्धशतकांच्या जोरावर 281 धावा केल्या आहेत. यात त्यानं केवळ 6 डावांत फलंदाजी केली. पाचव्या क्रमांकावर तीन वेळा खेळत त्यानं 119 धावा केल्या आहेत. तर, तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना 162 धवा केल्या आहेत. त्याची सरासरी 46.83 असून स्ट्राईक रेट 98.25 आहे.

वाचा-पुजाराचं शतक आणि रोहितच्या अर्धशतकाने विराटचं टेन्शन वाढलं

SPECIAL REPORT: समुद्र किनारी रेतीतच रंगला 'कुस्तीचा फड', नारळी पौर्णिमेची अलिबागमध्ये धूम

Published by: Renuka Dhaybar
First published: August 18, 2019, 3:20 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading