'धोनी महान खेळाडू म्हणून ओळखला जाईल', शास्त्रींचा मोठा खुलासा

'धोनी महान खेळाडू म्हणून ओळखला जाईल', शास्त्रींचा मोठा खुलासा

भारताचा यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनी गेल्या तीन महिन्यापासून क्रिकेटच्या मैदानावर दिसलेला नाही. त्यामुळे तो निवृत्ती घेणार का? तो संघात कधी परतणार असे प्रश्न विचारले जात आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 09 ऑक्टोबर : भारताच्या क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी वर्ल्ड कपनंतर क्रिकेटच्या मैदानावर दिसलेला नाही. इंग्लंडमध्ये झालेल्या आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेत न्यूझीलंडकडून पराभव झाल्यानंतर धोनीने एकही सामना खेळलेला नाही. वर्ल्ड कपनंतर धोनी निवृत्ती घेणार असं म्हटलं जात होतं. मात्र, त्याला पूर्णविराम मिळाला असून डिसेंबरमध्ये धोनी विंडीजविरुद्धच्या टी20 मालिकेतून पुनरागमन करू शकतो. दरम्यान, भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रींना धोनीच्या पुनरागमनाबद्दल विचारण्यात आलं. त्यावर शास्त्रींनी याचा निर्णय धोनी स्वत: घेईल असं म्हटलं आहे.

वर्ल्ड कपनंतर धोनीशी भेट झाली नसल्याचं संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी सांगितलं आहे. 'द हिंदू' ला दिलेल्या मुलाखतीत रवी शास्त्रींना विचारण्यात आलं की धोनीच्या पुनरागमनाची शक्यता आहे का? यावर रवी शास्त्री म्हणाले की, धोनी जर पुनरागमन करू इच्छित असेल तर तो सर्वस्वी त्याचा निर्णय असेल. धोनी भारताचा महान खेळाडू म्हणून ओळखला जाईल असं म्हटल्यानं सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

शास्त्री म्हणाले की, वर्ल्ड कपनंतर धोनीला भेटलोलो नाही. त्याने आधी क्रिकेट खेळायला सुरू करायला हवं. त्यानंतर काय होतं हे बघायला पाहिजे. त्याला वर्ल्ड कपनंतर क्रिकेट खेळलेलं पाहिलं नाही. जर त्याला पुनरागमन करायचं असेल तर त्याची माहिती निवड समितीला द्यावी लागेलं असं शास्त्री म्हणाले.

वाचा : IND vs SA : टीम इंडियाला पुण्यात इतिहास घडवण्याची संधी, करणार विश्वविक्रम?

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताने ऋद्धिमान साहाला यष्टीरक्षणाची संधी दिली आहे. ऋषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्यात आलं आहे. याबद्दल सांगताना रवी शास्त्री म्हणाले की, साहाला दुखापतीमुळे विश्रांती देण्यात आली होती. तो जगातील सर्वोत्तम यष्टीरक्षक असून घरच्या मैदानावर त्याची कामगिरी जबरदस्त आहे. पंतमध्ये प्रतिभा आहे आणि त्याच्या क्षमतेवर कोणतीही शंका नाही. मात्र तो अजुन तरूण आहे. त्याच्याकडं सुधारण्यासाठी बराच वेळ आहे.

वाचा : सामन्यावेळी मैदानावरच पंचांचा मृत्यू, क्रिकेट जगतात हळहळ

धोनी सध्या 38 वर्षांचा आहे. वर्ल्ड कपनंतर तो निवृत्ती घेईल अशी चर्चा होती. त्याच्याच नेतृत्वाखाली भारतानं 2011 मध्ये एकदिवसीय आणि 2007 मध्ये टी20 वर्ल्ड कप जिंकला होता. नुकताच धोनी मुंबईत चॅरीटी फुटबॉल सामना खेळताना दिसला होता. 2019 च्या वर्ल्ड कपनंतर धोनीने स्वत: आपण विंडीज आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी उपलब्ध नसल्याचं कळवलं होतं.

वाचा : गंभीरने धुतले मुलींचे पाय, पत्नीला विचारला 'हा' प्रश्न

VIDEO: वाशी स्थानकात लोकलच्या पेंटाग्राभला आग; हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 9, 2019 12:55 PM IST

ताज्या बातम्या