पंत तुला संघात रहायचं असेल तर सांभाळून! शास्त्रींचा 'सूचक' इशारा

पंत तुला संघात रहायचं असेल तर सांभाळून! शास्त्रींचा 'सूचक' इशारा

पंतला विंडीज दौऱ्यात केलेल्या चुकांबद्दल काही बोलणार नाही पण आता सुधारलं पाहिजे असं रवी शास्त्री म्हणाले.

  • Share this:

धर्मशाला, 16 सप्टेंबर : भारताचा मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी ऋषभ पंतला त्याच्या खेळावरून इशारा दिला आहे. धर्मशाला इथं पंतबद्दल शास्त्री म्हणाले की, विंडीज दौऱ्यात झालेल्या चुका पुन्हा झाल्या तर त्याचा फटका पंतला बसू शकतो. पंतने विंडीज दौऱ्यात निराशा केली. एकदिवसीय सामन्यात पहिल्याच चेंडूवर बाद झाला.

पंतला विंडीज दौऱ्यातील चुकांबद्दल काही बोलणार नाही मात्र, एकदिवसीय सामन्यात ज्यापद्धतीनं तो बाद झाला तसं पुन्हा झालं तर यावर विचार करावा लागेल असं शास्त्री म्हणाले. स्वत:च्या अपेक्षा राहुदे संघाच्याही तुमच्याकडून आशा आहेत. जेव्हा तुम्ही मैदानावर कर्णधारासोबत असता आणि धावसंख्येचा पाठलाग करता तेव्हा भागिदारीची गरज असते.

शास्त्री म्हणाले की, पंतच्या क्षमतेवर कोणीही प्रश्न उपस्थित करू शकत नाही. मात्र त्याची चुकीचा फटका खेळण्याची सवय आणि निर्णय घेण्यात सुधारणा करायला हवी. कोणीही त्याच्या फलंदाजीच्या शैलीत बदल कऱण्याबद्दल बोलत नाही. विराटनेही म्हटलं होतं की, फटका मारताना सावध रहायला हवं. जर यावर काम केलं तर पंतला रोखणं सोपं नाही.

ऋषभ पंतला त्याच्या चुकीतून शिकण्यासाठी एक किंवा त्यापेक्षा जास्त सामने लागतील. त्यानं आयपीएलमध्ये खूप सामने खेळले आहेत आणि तो शकेल. आता वेळ आली आहे की त्यानं जबाबदारी घ्यावी आणि क्षमतेनुसार खेळ करावा असं रवी शास्त्री म्हणाले.

भारताचा कर्णधार विराट कोहलीनेसुद्धा म्हटलं होतं की, पंतने सामन्यातील परिस्थितीनुसार खेळावं. त्यानं त्याच्या पद्धतीनं खेळण्यापेक्षा सामन्याची गरज ओळखून खेळायला हवं.

'मला HIV झालाय', दिग्गज खेळाडूला नाईलाजास्तव करावं लागलं जाहीर!

भारताचा युवा क्रिकेटपटू मॅच फिक्सिंगमध्ये? सट्टेबाजांच्या संपर्कात असलेल्यांची BCCI कडून चौकशी

VIDEO: भाजपची फसलेली ऑफर! पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितला किस्सा

Published by: Suraj Yadav
First published: September 16, 2019, 12:07 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading