धोनीबद्दल शास्त्रींचा मोठा खुलासा, 'त्याला विश्रांती घ्यायची होती पण...'

धोनीबद्दल शास्त्रींचा मोठा खुलासा, 'त्याला विश्रांती घ्यायची होती पण...'

भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री म्हणाले की, धोनी एक महान खेळाडू आहे आणि जितकं क्रिकेट खेळायचं होतं तितकं खेळला आहे पण तो संघात पुनरागमन करणार असेल तर त्याला कोण रोखणार.

  • Share this:

नवी दिल्ली, 10 डिसेंबर : भारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनीच्या क्रिकेट करिअरबद्दल वर्ल्ड कपनंतर सातत्याने चर्चा होत आहे. याबद्दल धोनीलाही एकदा विचारण्यात आलं तेव्हा त्याने जानेवारीपर्यंत काही विचारू नका असं म्हटलं होतं. दरम्यान, याबाबत वारंवार निवड समिती, बीसीसीआय़ अध्यक्ष, प्रशिक्षक यांना प्रश्न विचारले जातात. भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवि शास्री यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं की पुनरागमन की निवृत्ती हा निर्णय पुर्णपणे धोनीचा असणार आहे. जेव्हा त्याला वाटेल की खेळू शकतो तेव्हा संघात पुनरागमन कऱण्याचा दावा धोनी करू शकतो. हा निर्णय़ आयपीएलनंतर घेण्यात य़ेईल. तसेच त्याला वाटलं संघातून खेळू शकतो तर कोण थांबवू शकणार आहे असंही शास्त्री म्हणाले.

आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप 2019 नंतर धोनी क्रिकेटपासून दूर आहे. दरम्यान, त्याच्या निवृत्तीच्या चर्चा अधुनमधून होत असतात. काही दिवसांपूर्वी सांगण्यात आलं होतं की, धोनीने पुन्हा सराव सुरु केला असून तो जानेवारीनंतर भारतीय संघात पुनरागमन करू शकतो.

इंडिया टुडेशी बोलताना रवी शास्त्री यांनी सांगितलं की, धोनीने कधीही स्वत:चे मत संघावर लादले नाही. तो एक महान खेळाडू आहे. मी जितकं त्याला ओळखतो तो कधीच स्वत:चे निर्णय संघावर लादणार नाही. त्याला विश्रांती घ्यायची होती पण तो आयपीएल खेळणार आहे.

धोनीला जितकं खेळायचं आहे तितकं तो खेळला आहे. पण जर तो अजुन खेळणार असं म्हणत असेल आणि आयपीएलनंतर त्याला वाटलं तर तो खेळू शकतो. त्यावर कोणीही वाद घालू नये असंही शास्रींनी सांगितले.

वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये भारताला न्यूझीलंडकडून पराभूत व्हावं लागलं. धोनीने वर्ल्ड कपनंतर एकही सामना खेळलेला नाही. त्याने टेरिटोरीयल आर्मीमध्ये 15 दिवसांचे प्रशिक्षण घेतलं. तिथं जम्मू काश्मीरमधील पॅराशूट रेजिमेंटच्या 106 बटालियनमध्ये ड्यूटीही केली. त्यानतंर तो वेगवेगळ्या ठिकाणी दिसला पण खेळण्याबाबत किंवा निवृत्तीबाबत फारशी चर्चा त्याने केलेली नाही. त्यामुळे धोनी काय निर्णय घेणार याची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: MS Dhoni
First Published: Dec 10, 2019 12:07 PM IST

ताज्या बातम्या