‘साधे बूट बांधता येत नाहीत आणि चालले धोनीची मापं काढायला’

‘साधे बूट बांधता येत नाहीत आणि चालले धोनीची मापं काढायला’

धोनीवर टीका करणाऱ्यांना रवी शास्त्रींनी घेतले फैलावर.

  • Share this:

नवी दिल्ली, 26 ऑक्टोबर : इंग्लंडमध्ये झालेल्या वर्ल्ड कप 2019मध्ये भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं अखेरचा सामना खेळला. त्यानंतर क्रिकेट जगतात धोनीच्या निवृत्तीवरून चर्चा सुरू झाल्या. वर्ल्ड कपनंतर झालेल्या वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका दौऱ्यात धोनीनं विश्रांती घेतली. एवढेच नाही तर, नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या बांगलादेश दौऱ्यातही धोनीचा संघात समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळं धोनी कधी पुनरागमन करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

धोनीच्या विश्रांतीमुळं फक्त क्रिकेट चाहतेच नाही तर कर्णधार विराट कोहली आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीही चिंतेत आहेत. मात्र आता भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी धोनीबाबत प्रश्न विचारणाऱ्यांना फैलावर घेतले आहे. सध्या जगभरात धोनी आपल्या भविष्याबाबत काय करणार आहे, असे प्रश्न विचारत असतात. त्यामुळं धोनीचे समर्थन करत रवी शास्त्री यांनी टीकाकारांना सडेतोड उत्तर दिले आहे.

वाचा-क्रिकेट चाहत्यांसाठी सर्वात मोठी बातमी, अखेर धोनीच्या कमबॅकची तारीख ठरली

टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत रवी शास्त्री यांनी, “काही लोकांना आपले बुटही बांधता येत नाही. ते आता धोनीवर बोलत आहेत”, असे म्हणत टीका केली. तसेच, “धोनीवर टीका करण्याआधी त्यानं देशासाठी काय केलं आहे, हे पाहावे. मला कळत नाही की लोकांना काय एवढी घाई आहे की धोनीनं निवृत्ती घ्यावी. कदाचित लोकांकडे बोलण्यासाठी काही मुद्दे नाही आहत”, असे सांगत आपला राग व्यक्त केला. दरम्यान शास्त्री यांनी, धोनीचे समर्थन करत जेव्हा ते व्हायचे आहे तेव्हा ते होईल असे सांगितले.

वाचा-संघात परतण्यासाठी धोनीची तयारी सुरू, VIDEO VIRAL

‘धोनीला माहित आहे कधी काय करायचे’

भारताच्या मुख्य प्रशिक्षकांनी यावेळी चाहत्यांना, धोनीवर मत व्यक्त करताना सन्मानाची भावना ठेवा, असे आवाहन केले. तसेच, “15 वर्ष धोनीनं देशाला दिली आहेत. त्यामुळं त्याला माहित आहे, काय करायचे आहे. जेव्हा धोनीला वाटले तेव्हा त्यानं कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली”, असे सांगितले. दरम्यान यावेळी त्यांन ऋध्दीमान साहा हाच कसोटीमध्ये यष्टीरक्षक म्हणून योग्य पर्याय असल्याचे सांगितले.

वाचा-धोनी, ऋषभ आणि 'तो', स्पेशल भेटीच्या फोटोची सोशल मीडियावर चर्चा

जानेवारीमध्ये धोनी करणार कमबॅक?

जानेवारीमध्ये महेंद्रसिंग धोनी प्रतिस्पर्धात्मक क्रिकेटमध्ये कमबॅक करणार आहे. भारत-दक्षिण आफ्रिका दौऱ्यात झालेल्या कसोटी सामन्यात रांची येथे धोनी उपस्थित होता. दरम्यान एक्सप्रेसनं दिलेल्या माहितीनुसार धोनी सैयद मुश्ताफ अली ट्रॉफीमध्ये खेळणार आहे. झारखंड संघाकडून कमबॅक करण्यासाठी धोनीनं ट्रेनिंगला सुरुवात केली आहे. जानेवारी 2020मध्ये धोनी सैयद अली स्पर्धेत खेळण्यास सुरुवात करणार आहे. झारखंडच्या वरिष्ठ संघात धोनी पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहे. यासाठी धोनी आतापासून राज्य अंडर-23 संघाकडून अभ्यास वर्गाला सुरुवात केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: MS Dhoni
First Published: Oct 26, 2019 02:06 PM IST

ताज्या बातम्या