Elec-widget

गावस्कर यांच्यासह दिग्गज क्रिकेटपटूंपेक्षा मी वेगळा, रवी शास्त्रींनी शेअर केला PHOTO

गावस्कर यांच्यासह दिग्गज क्रिकेटपटूंपेक्षा मी वेगळा, रवी शास्त्रींनी शेअर केला PHOTO

भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी सोशल मीडियावर एक जुना फोटो शेअर केला आहे.

  • Share this:

मुंबई, 25 सप्टेंबर : भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री सोशल मीडियावर सक्रीय असतात. अनेकदा त्यांना ट्रोलही व्हावं लागलं आहे. विंडीज दौऱ्यावर असताना त्यांनी काही फोटो शेअर केले होते. आता काही वर्षांपूर्वीचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत रवी शास्त्री, सुनील गावस्कर यांच्यासह भारताचे माजी क्रिकेटपटू दिसत आहेत.

रवी शास्त्रींनी इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. ब्लॅक अँड व्हाइट फोटोमध्ये रवी शास्त्री तत्कालीन भारतीय संघातील खेळाडूंसोबत आहेत. यामध्ये दिलीप वेंगसरकर, के. श्रीकांत, यशपाल शर्मा, रॉजर बिन्नी, सय्यद किरमानी हेदेखील दिसत आहेत. या फोटोला कॅप्शन देताना शास्त्री म्हणाले आहेत की, मी नेहमीच माझ्या संघ सहकाऱ्यापेक्षा वेगळा असायचो. माझ्याकडे प्रवासात जास्त साहित्य नसायचं.

शास्त्रींनी शेअर केलेल्या फोटोत सर्व खेळाडूंच्या हातात काहीतरी साहित्य आहे. मात्र, शास्त्रींकडे काही दिसत नाही. त्यांनी हा फोटो नेमका कधीचा आहे हे सांगितलं नाही.

Loading...

गेल्याच महिन्यात रवी शास्त्रींची पुन्हा एकदा भारताच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड कऱण्यात आली. शास्त्रींचा हा चौथा कार्यकाळ आहे. 2017 पासून 2019 वर्ल्ड कपपर्यंत शास्त्री प्रशिक्षक होते. त्यानंतर विंडीज दौऱ्यानंतर पुन्हा एकदा त्यांची मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली.

VIDEO: पवारांवरील कारवाईनंतर बारामीतकरांमध्ये रोष, रस्त्यावर उतरून केली निदर्शनं

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 25, 2019 01:00 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...