मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

पुनश्च हरि ओम! Ravi Shastri आपल्या जुन्या शैलीत परतणार, मिळणार मोठी जबाबदारी

पुनश्च हरि ओम! Ravi Shastri आपल्या जुन्या शैलीत परतणार, मिळणार मोठी जबाबदारी

Ravi Shastri

Ravi Shastri

टीम इंडियाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (ravi shastri) पुन्हा एकदा आपल्या जुन्या शैलीत परतणार असल्याची शक्यता क्रिकेट जगतात वर्तवण्यात येत आहे.

  • Published by:  Dhanshri Otari

नवी दिल्ली, 21 डिसेंबर: टीम इंडियाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) पुन्हा एकदा आपल्या जुन्या शैलीत परतणार असल्याची शक्यता क्रिकेट जगतात वर्तवण्यात येत आहे. तब्बल 7 वर्षे टीम इंडियाशी संलग्न राहिल्यानंतर रवी शास्त्री पुन्हा एकदा कॉमेंट्री पॅनलमध्ये परतत आहेत. अशी चर्चा सध्या क्रिकेट वर्तुळात सुरु आहे.

रिपोर्ट्सनुसार, रवी शास्त्री दक्षिण आफ्रिका आणि भारताविरुद्धच्या आगामी कसोटी आणि एकदिवसीय मालिकेत समालोचन करताना दिसतील. स्टार स्पोर्ट्स इंडियाने रवी शास्त्रीबद्दल एक प्रोमो देखील जारी केला आहे, ज्यामध्ये क्रिकेट चाहत्यांना रवी शास्त्री कॉमेंट्री पॅनेलमध्ये परत येत असल्याचे संकेत दिले आहेत.

स्टार स्पोर्ट्सने शेअर केलेल्या एका प्रोमोमध्ये रवी शास्त्री किचनमध्ये कोणत्यातरी पदार्थाची चव घेत आहेत. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘काहीतरी शिजत आहे.. सांगा रवी शास्त्री याठिकाणी कशासाठी आले आहेत आणि जाणून घेण्यासाठी आमच्यासोबत राहा.’

स्टार स्पोर्ट्सने शेअर केलेल्या या प्रोमोमधून स्पष्ट होत आहे की, रवी शास्त्री मुख्य प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिल्यानंतर पुन्हा त्यांच्या जुन्या अंदाजात दिसतील. भारतीय संघ सध्या दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर आहे. दक्षिण अफ्रिका दौऱ्यात सघाला तीन सामन्यांची कसोटी आणि एकदिवसीय मालिका खेळायची आहे. या दौऱ्यात रवी शास्त्री समालोचकाची भूमिका पार पाडतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

रवी शास्त्रींनी 7 वर्ष भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकाची भूमिका पार पाडली आहे. मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी रवी शास्त्री एक उत्कृष्ट समालोचक म्हणून ओळखले जात असायचे. नोव्हेंबरमध्ये टी20 वर्ल्डकप संपल्यानंतर शास्त्रींचा भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकाच्या रूपातील कार्यकाळ संपला होता.

दक्षिण अफ्रिका आणि भारत यांच्यात 26 डिसेंबरपासून टेस्ट सीरीजला सुरुवात होणार आहे. टेस्ट आणि वनडे सीरीजमध्ये प्रत्येकी तीन मॅच खेळवण्यात येणार आहेत. रवि शास्त्री पुन्हा त्यांच्या जुन्या भूमिकेत दिसणार ही चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे.

त्यांनी अनेक ऐतिहासीक क्षणांवर समालोचन केले आहे. यामध्ये 2007 टी20 वर्ल्डकपमध्ये विजय, युवराज सिंगने मारलेले सहा चेंडूतील सहा षटकार, तसेच एमएसधोनीने 2011 वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात मारलेला शेवटचा षटकार अशा क्षणांचा समावेश आहे. मुख्य प्रशिक्षकाच्या रूपात त्यांनी चांगले काम केले असले तरी, यादरम्यान चाहते त्यांच्या समालोचनाची आठवण काढत असायचे. आता पुन्हा एकदा शास्त्री चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी उपस्थित राहतील, अशी शक्यता आहे.

First published:

Tags: BCCI, Ravi shastri