Home /News /sport /

'World Cup तर गांगुली-द्रविडलाही जिंकता आला नाही', विराटसाठी शास्त्रींची बॅटिंग

'World Cup तर गांगुली-द्रविडलाही जिंकता आला नाही', विराटसाठी शास्त्रींची बॅटिंग

ravi shastri

ravi shastri

भारतीय क्रिकेट टीमचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी टीम इंडियाच्या (Team India) दिग्गजांबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. टी-20 वर्ल्ड कप 2021 (T20 World Cup 2021) नंतर रवी शास्त्रींनी प्रशिक्षकपद सोडलं.

    मुंबई, 25 जानेवारी : भारतीय क्रिकेट टीमचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी टीम इंडियाच्या (Team India) दिग्गजांबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. टी-20 वर्ल्ड कप 2021 (T20 World Cup 2021) नंतर रवी शास्त्रींनी प्रशिक्षकपद सोडलं. शास्त्रींच्या कार्यकाळात टीम इंडियाने परदेशामध्ये उल्लेखनीय कामगिरी केली. टीमने ऑस्ट्रेलियाचा ऑस्ट्रेलियात (India vs Australia) दोनदा टेस्ट सीरिजमध्ये पराभव केला, तर इंग्लंडमधल्या टेस्ट सीरिजमध्ये 2-1 ने आघाडी घेतली. विराट कोहली (Virat Kohli) आणि शास्त्रींची जोडी टीम इंडियासाठी हिट ठरली, पण दोघांनाही भारताला आयसीसी ट्रॉफी जिंकवता आली नाही. कोहली आता कोणत्याच फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचा कर्णधार राहिलेला नाही. दक्षिण आफ्रिकेतल्या टेस्ट सीरिजमध्ये टीम इंडियाचा 2-1 ने पराभव झाल्यानंतर विराटने कॅप्टन्सी सोडली होती. एवढा काळ कोणत्या टीमने चांगली कामगिरी केली आहे, ते सांगा? असा सवाल रवी शास्त्रींनी उपस्थित केला. 'मोठ्या खेळाडूंनाही वर्ल्ड कप जिंकता आलेला नाही. सौरव गांगुली, राहुल द्रविड, व्हीव्हीएस लक्ष्मण, अनिल कुंबळे आणि रोहित शर्मा वर्ल्ड कप जिंकू शकले नाहीत. याचा अर्थ ते खराब खेळाडू आहेत, असा नाही. सचिनलाही (Sachin Tendulakar) पहिला वर्ल्ड कप जिंकायच्या आधी 6 वर्ल्ड कप खेळावे लागले,' असं शास्त्री म्हणाले. दक्षिण आफ्रिकेत पराभव दक्षिण आफ्रिका दौऱ्यात टीम इंडियाचा (Team India) टेस्ट सीरिजमध्ये 2-1 ने आणि वनडे सीरिजमध्ये 3-0 ने पराभव झाला. कोहलीच्या कार्यकाळात टीम 5 वर्ष पहिल्या क्रमांकावर राहिली. दक्षिण आफ्रिका दौऱ्याआधीच विराट कोहली आणि सौरव गांगुली यांच्यातल्या वादाच्या बातम्याही समोर आल्या. बीसीसीआय (BCCI) टेस्ट कॅप्टन्सीवरून हटवेल, अशी भीती वाटल्यामुळे विराटने कॅप्टन्सी सोडली, असं वक्तव्य सुनिल गावसकर यांनी केलं. राहुल द्रविड नवीन कोच रवी शास्त्री यांच्या जागी राहुल द्रविड (Rahul Dravid) यांची मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली. तर रोहित शर्माला (Rohit Sharma) वनडे आणि टी-20 टीमचं कर्णधार करण्यात आलं आहे. अजूनपर्यंत टेस्ट टीमच्या कॅप्टन्सीची घोषणा झालेली नाही. यावर्षी ऑस्ट्रेलियात टी-20 वर्ल्ड कप (T20 World Cup 2022) होणार आहे, त्यामुळे चाहत्यांना आता रोहित आणि द्रविडकडून अपेक्षा असेल. भारताला 2013 नंतर आयसीसी ट्रॉफी जिंकता आलेली नाही.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Ravi shastri, Team india, Virat kohli

    पुढील बातम्या