Coronavirus टीम इंडियासाठी ठरतोय 'फायद्याचा', रवी शास्त्रींनी केलं मोठं वक्तव्य

Coronavirus टीम इंडियासाठी ठरतोय 'फायद्याचा', रवी शास्त्रींनी केलं मोठं वक्तव्य

कोरोना व्हायरसमुळे जगभर हाहाकार माजला आहे. भारतातही कोरोनाग्रस्तांची संख्या 800 च्या वर गेली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 28 मार्च :  कोरोना व्हायरसमुळे सध्या जगभरातील क्रीडा स्पर्धा जवळपास रद्द झाल्या आहेत. यामुळे खेळाडू घरात आराम करत आहेत. यावर भारतीय क्रिकेट संघाचे प्रमुख प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी म्हटलं की, कोरोना व्हायरसच्या साथीमुले खेळाडूंना ब्रेक मिळाला आहे. यामुळे त्यांना फ्रेश होण्यास मदत मिळेल. खेळाडूंना ब्रेक घेण्यासाठी हीच योग्य वेळ असल्याचं ते म्हणाले.

रवी शास्त्री म्हणाले की, गेल्या दहा महिन्यांपासून खेळाडू खेळत आहेत. त्यांच्यासह सपोर्ट स्टाफमधील अनेक लोक वर्ल्ड कपसाठी मे मध्ये भारतातून रवाना झाले होते. त्यानंतर फक्त 10 ते 11 दिवसच ते घरी गेले असतील. काही खेळाडू तीनही प्रकारात खेळत आहेत.

सततच्या खेळामुळे टीम इडियाच्या खेळाडूंना प्रवासही करावा लागला. इंग्लंडमध्ये वर्ल्ड कपनंतर विंडीज दौरा झाला. त्यानंतर भारतात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिका झाली. त्यानंतर न्यूझीलंड दौऱ्यावर टीम इंडिया गेली. हे खूप कठीण आहे. मात्र खेळाडूंसाठी हे चांगलं असल्याचंही शास्त्री म्हणाले.

कोरोनामुळे देशात 21 दिवस लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे भारत - दक्षिण आफ्रिका दौरा अर्धवट रद्द कऱण्यात आला. तर आयपीएल सध्या तरी पुढे ढकलण्यात आली आहे. रवी शास्त्रींनी सांगितलं की, हे खूप हैराण कऱणारं होतं. पण खरं सागायचं तर याचा अंदाज आम्हालाही होता जेव्हा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसरा एकदिवसीय सामना रद्द झाला. त्यावेळी वाटलं की काही तरी होत आहे. न्यूझीलंड दौऱ्यातच याची कल्पना आली होती.

हे वाचा : पोलीस कर्मचाऱ्यांसाठी इरफान पठाणने केली 'ही' मागणी, VIDEO VIRAL

रवी शास्त्रींनी सांगितलं की, भारतीय संघ न्यूझीलंडमधून मायदेशी परतला तेव्हा वाटलं की योग्य वेळी बाहेर पडलो. कारण तोपर्यंत न्यूझीलंडमध्ये फक्त दोनच कोरोनाचे रुग्ण आढळले होते. आतापर्यंत ते 300 पर्यंत पोहोचले आहेत. जेव्हा भारतीय संघ मायदेशात परतला तेव्हा विमानतळावर त्यांचं स्क्रिनिंग आणि तपासणी केली जात होती.

'श्वासही घेता येत नव्हता पण...', कोरोनाला हरवल्यानंतर खेळाडूनं सांगितला अनुभव

First published: March 28, 2020, 4:38 PM IST

ताज्या बातम्या