India vs Bangladesh : कौतुकासाठी शब्द कमी पडत होते, अशा लाडक्या खेळाडूचा शास्त्रींनी केला पत्ता कट

India vs Bangladesh : ज्या खेळाडूचे रवी शास्त्रींनी बांधले कौतुकांचे पूल, त्यालाच संघात दिली नाही जागा

News18 Lokmat | Updated On: Oct 25, 2019 01:57 PM IST

India vs Bangladesh : कौतुकासाठी शब्द कमी पडत होते, अशा लाडक्या खेळाडूचा शास्त्रींनी केला पत्ता कट

मुंबई, 25 ऑक्टोबर : भारतीय संघात खेळण्याची संधी मिळावी हे प्रत्येक युवा खेळाडूचे स्वप्न असते. जेव्हा हे स्वप्न पूर्ण होते, तेव्हा प्रत्येक खेळाडूसाठी असे दिवस सुवर्णमय असतात. दक्षिण आफ्रिका विरोधात तिसऱ्या कसोट सामन्याआधी अशाच एका युवा खेळाडूचे नशीब पालटले. एक दिवसआधी रांचीमध्ये खेळण्यासाठी शाहबाज नदीमला (Shahbaz Nadeem) बोलवण्यात आले. उमेश यादवला दुखापत झाल्यामुळं नदीमला संघात जागा मिळाली. बांगलादेश विरोधात भारत दोन कसोटी सामने खेळणार आहे.

दक्षिण आफ्रिका विरोधात तिसऱ्या कसोटी सामन्यात नदीमनं चार विकेट घेतल्या. मात्र बांगलादेश विरोधात नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या कसोटी मालिकेत नदीमला संघात स्थान मिळाले नाही. एवढेच नाही तर प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी दक्षिण आफ्रिका विरोधात झालेल्या कसोटी सामन्यानंतर नदीमचे कौतुक केले. मात्र त्यानंतरही त्याला संघात जागा मिळाली नाही.

वाचा-भारताला मिळाला टी-20चा नवा कर्णधार! संघानं दिली नव्या चेहऱ्यांना संधी

रवी शास्त्री यांनी केले होते नदीमचे कौतुक

शाहबाज नदीमला बांगलादेशविरोधात झालेल्या कसोटी सामन्यात संघात जागा न मिळाल्यानंतर चाहत्यांनी आश्चर्य व्यक्त केला आहे. दक्षिण आफ्रिका विरोधातली सामन्यानंतर रवी शास्त्री यांनी, “नदीमनं आपल्या खेळीनं प्रभावित केले आहे. त्यानं जेव्हा पहिली विकेट घेतली तेव्हा जर बिशन सिंग बेदी असते तर, त्यांन चीअर्स यंग मॅन असे म्हटले असते”, असे म्हणत कौतुक केले होते.

Loading...

स्थानिक क्रिकेटमध्ये उत्कृष्ठ कामगिरी

शाहबाज नदीमनं स्थानिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. याचबरोबर तो आयपीएलमध्येही चांगला खेळताना दिसला. मात्र भारतीय संघात जागा मिळवण्यासाठी नदीमला 420हून अधिक विकेट आपल्या नावावर कराव्या लागल्या. स्थानिक क्रिकेटमध्ये नदीमनं उत्कृष्ठ कामगिरी केली आहे. दक्षिण आफ्रिका विरोधात त्यानं चार विकेट घेण्याची कामगिरी केली होती. यात सुरुवातीचे तीन ओव्हर मेडन टाकले होते.

वाचा-रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सला मिळाला ‘पप्पू’! स्थानिक क्रिकेटमध्ये करतोय कमाल

111 सामन्यांमध्ये घेतले 428 विकेट

शाहबाज नदीमनं (Shahbaz Nadeem) वयाच्या 30व्या वर्षी कसोटी क्रिकेटमध्ये पदापर्ण केले. गेली 15 वर्ष नदीम प्रथम श्रेणी क्रिकेट खेळत आहे. त्यानं 111 सामन्यात 428 विकेट घेतल्या आहेत. तर, लिस्ट ए सामन्यात 106 सामन्यात 145 विकेट घेतल्या आहेत.

वाचा-‘कार्तिकने माझ्या करिअरचं वाटोळं केलं, तो माफीच्या लायक नाही'

असा आहे भारताचा कसोटी संघ- विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, ऋध्दीमान साहा, रविंद्र जडेजा, आर. अश्विन, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, उमेश यादव, इशांत शर्मा, शुभमन गील, ऋषभ पंत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 25, 2019 01:57 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...