Home /News /sport /

IND VS AUS : ‘...म्हणून विराटपेक्षा कॅप्टन म्हणून वेगळा आहे अजिंक्य रहाणे’ : कोच रवी शास्त्री काय म्हणाले वाचा

IND VS AUS : ‘...म्हणून विराटपेक्षा कॅप्टन म्हणून वेगळा आहे अजिंक्य रहाणे’ : कोच रवी शास्त्री काय म्हणाले वाचा

इंडिया आणि ऑस्ट्रेलिया(India Vs Australia) यांच्यातील दुसऱ्या टेस्टमध्ये Team India ने रहाणेच्या (Ajinkya Rahane) नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाचा 8 विकेट्सनी पराभव केला

    मेलबर्न, 29 डिसेंबर : इंडिया आणि ऑस्ट्रेलिया(India Vs Australia) यांच्यातील दुसऱ्या टेस्टमध्ये इंडियन टीमने ऑस्ट्रेलियाचा 8 विकेट्सनी पराभव केला आहे. या सामन्यात इंडियन टीमने ऑस्ट्रेलियाच्या बॅट्समनला कमबॅकची संधी न देता आज सकाळच्या सेशनमध्येच ऑलआउट केलं. Team India हा कसोटी सामना अजिंक्य रहाणेच्या (Ajinkya Rahane) नेतृत्वाखाली खेळत होता. चौथ्या दिवशीच ऑस्ट्रेलियन टीमची इनिंग अवघ्या 200 धावांमध्ये गुंडाळल्यानंतर इंडियाने जिंकण्यासाठी आवश्यक असलेल्या 70 रन 2 विकेट्स गमावत पूर्ण केल्या. याचबरोबर बॉक्सिंग डे टेस्टमध्ये विजय मिळवत इंडियन टीमने बॉर्डर-गावसकर सिरीजमध्ये 1-1 अशी बरोबरी साधली. भारतीय क्रिकेट संघाचे कोच रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी कॅप्टन अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) याच्या कॅप्टन्सीचं तोंडभरून कौतुक केलं आहे. विराट कोहली पॅटर्निटी लीव्ह (Paternity leave) वर असल्याने रहाणे टीमचं नेतृत्व करत आहे. विराटच्या नेतृत्वाखाली पहिल्या टेस्टमध्ये इंडियन टीमचा लाजीरवाणा पराभव झाल्यानंतर इंडियन टीम ही सिरीज 4-0 अशी हरणार असल्याची भविष्यवाणी अनेकांनी केली होती. आजच्या विजयानंतर आता सर्वांची तोंडं बंद झाली असून कोच रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी कॅप्टन अजिंक्य रहाणे याच्याबरोबर टीममधील अनेक खेळाडूंचे कौतुक केलं आहे. IND vs AUS : टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियाला 'बॉक्सिंग' पंच, पाहा HIGHLIGHTS रवी शास्त्री यांनी अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) याच्या कॅप्टन्सीच्या कौतुक करताना रहाणे शांत कर्णधार असल्याचं म्हटलं. “विराट कोहली आक्रमक कप्तान असून रहाणे शांत आहे. त्यामुळं त्याला खेळामध्ये मदत होत असून या मॅचमध्ये त्याच्या शतकी खेळीमुळं इंडियन टीमला पहिल्या इनिंगमध्ये आघाडी घेण्यास यश मिळालं”, असं शास्त्री म्हणाले. “त्याने सर्वात अवघड दिवशी बॅटिंग करून इंडियन टीमला चांगल्या स्थितीत आणलं. तो हुशार कॅप्टन असून खेळाडूंना त्याच्या या शांतपणामुळं प्रेरणा मिळते. शांतपणे खेळ समजून घेतल्यामुळे त्याला कामगिरी करण्यास फायदा होत असल्याचं”, शास्त्रींचं म्हणणं आहे. रहाणेबरोबरच रवी शास्त्री यांनी पदार्पण करणाऱ्या मोहम्मद सिराज आणि शुभमन गिल यांचं देखील कौतुक केलं. रहाणेच्या खेळाने मॅचमध्ये टर्न रवी शास्त्री यांनी त्याच्या खेळाचे कौतुक करताना त्याची खेळी टर्निंग पॉईंट ठरल्याचे देखील त्यांनी म्हटलं. अजिंक्य चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला कॅप्टन म्हणून हा निर्णय महत्त्वाचा होता असं शास्त्री यांनी म्हटले. ढगाळ वातावरण असताना त्याने जवळपास 6 तास बॅटिंग करत टीमला अडचणीतून बाहेर काढले. तसेच सिराज आणि गिल यांनी देखील चांगली कामगिरी केल्याचे शास्त्री यांनी म्हटले. IND vs AUS : अजिंक्यने पुन्हा जिंकली मनं, मैदानातून बाहेर जाताना... दरम्यान, पहिल्या टेस्टमध्ये पराभव झाल्यानंतर ड्रेसिंग रूममध्ये कोणत्याही प्रकारची चर्चा झाली नसल्याचे देखील शास्त्री यांनी म्हटले. इंडियन टीम मागील 3 ते 4 वर्षांपासून उत्तम क्रिकेट खेळत असून सर्वच प्लेअर शानदार परफॉरमन्स देत असल्यानं संघ टॉपला आहे. त्यामुळं आगामी 2 मॅचमध्ये शानदार कामगिरी करून सिरीजमध्ये विजय मिळवण्याचा इंडियन टीमचा प्रयत्न राहणार आहे.
    First published:

    Tags: Ajinkya rahane, Cricket, India vs Australia, Virat kohali

    पुढील बातम्या