मुंबई, 18 जुलै : ICC Cricket World Cupनंतर आता भारतीय संघात महत्त्वाचे बदल करण्यास सुरुवात झाली आहे. यासंदर्भात बीसीसीआयनं मंगळवारी मुख्य प्रशिक्षकांसह इतर पदांसाठी अर्ज मागवले आहेत. ज्या पदांसाठी अर्ज मागवले आहेत, त्यामध्ये भारतीय पुरुष क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक, फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक, फिजिओथेरपिस्ट, स्ट्रेंथ अॅण्ड कंडीशनिंग कोच, प्रशासकिय व्यवस्थापक या पदांचा समावेश आहे. दरम्यान, संघाची रणनिती ठरवणारा आणि संघ बांधणीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या प्रशिक्षकासाठी त्यासारखी योग्यता हवी असं बीसीसीआयनं म्हटलं आहे. त्यासाठी बीसीसीआयने तीन महत्त्वाच्या अटी घातल्या आहेत.
दरम्यान या सगळ्यात भारतीय संघाचे सध्याचे प्रशिक्षक रवी शास्त्री अपात्र ठरणार आहेत. याचे कारण म्हणजे बीसीसीआयनं घातलेल्या अटी. बीसीसीआयनं घातलेल्या अटींनुसार मुख्य प्रशिक्षकाकडे कसोटी खेळणाऱ्या संघाला दोन ते तीन वर्ष प्रशिक्षण देण्याचा अनुभव असावा. शिवाय त्याने 30 कसोटी किंवा 50 वन डे सामने खेळलेले असावेत. तसेच, फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षक प्रशिक्षकांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने किमान 10 कसोटी किंवा 25 वन डे सामने खेळलेले असावेत. त्याचबरोबर त्यांचे वय 60 वर्षांहून कमी असावेत.
रवी शास्त्री पात्रच नाही
रवी शास्त्री 2014मध्ये ते भारतीय संघाचे संचालक म्हणून कार्यरत होते. शास्त्री यांनी 1982 ते 1992 पर्यंत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले. त्यानंतर 2007 साली बांगलादेशविरुद्ध झालेल्या मालिकेचा अनुभव वगळता त्यांच्याकडे प्रशिक्षणाचा फारसा अनुभव नाही. तर, 2014च्या इंग्लंड दौऱ्यात शास्त्रींची संचालक म्हणून नेमणूक करण्यात आली होती. तेव्हा डंकन फ्लेचर हे भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक होते आणि 2015 च्या वर्ल्ड कपनंतर त्यांना पायउतार व्हावे लागले. त्यानंतर जून 2016पर्यंत शास्त्री हे संचालक म्हणूनच संघासोत होते. त्यामुळे प्रशिक्षकाच्या अनुभवाच्या नियमानुसार शास्त्री अपात्र ठरताना पाहायला मिळत आहेत.
केवळ वयाच्या अटीत शास्त्री योग्य
बीसीसीआयनं घातलेल्या अटींमध्ये प्रशिक्षकाला वयाची अटही घातली आहे. प्रशिक्षकाचे वय हे वय 60 वर्षांहून कमी असावेत. दरम्यान शास्त्रींचे सध्याचे वय 57 वर्ष आहे. मात्र असे असले तरी, शास्त्रींची निवड होण्याची शक्यता कमी आहे.
'हे' तीन दिग्गज क्रिकेटपटू निवडणार भारताचे नवे कोच
सर्वोच्च न्यायालयाने प्रशिक्षकाच्या निवडीसाठी तीन सदस्यीय क्रिकेट सल्लागार समिती नेमली आहे. या समितीचे अध्यक्षपद माजी कर्णधार कपिल देव यांच्याकडे असणार आहे. तर, अंशुमन गायकवाड व शांथा रंगास्वामी हे देखील या समितीचे सदस्य आहेत.याआधी BCCI ने सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्ही व्ही एस लक्ष्मण यांची सल्लागार समिती नेमली होती, पण ही समिती बरखास्त करण्यात आली आहे.
देवदूत मोटरमन; ...अन्यथा 500 फूट खोल दरीत कोसळली असती एक्स्प्रेस