• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • टीम इंडियाचं प्रशिक्षकपद सोडल्यानंतर रवी शास्त्रींची नवी इनिंग, या लीगमध्ये दिसणार!

टीम इंडियाचं प्रशिक्षकपद सोडल्यानंतर रवी शास्त्रींची नवी इनिंग, या लीगमध्ये दिसणार!

रवी शास्त्रींचा (Ravi Shastri) टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक (Team India Head Coach) म्हणून कार्यकाळ संपला आहे. यानंतर शास्त्री त्यांची नवी इनिंग सुरू करण्यासाठी सज्ज आहेत.

 • Share this:
  मुंबई, 15 नोव्हेंबर : रवी शास्त्रींचा (Ravi Shastri) टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक (Team India Head Coach) म्हणून कार्यकाळ संपला आहे. यानंतर शास्त्री त्यांची नवी इनिंग सुरू करण्यासाठी सज्ज आहेत. रवी शास्त्री आता लीजंड्स क्रिकेट लीगशी (Legends Cricket League) जोडले गेले आहेत. रवी शास्त्रींचा टीम इंडियातला कार्यकाळ टी-20 वर्ल्ड कपनंतर संपला. स्पर्धा सुरू व्हायच्या सुरुवातीलाच त्यांनी आपण पुन्हा या पदासाठी अर्ज करणार नसल्याचं सांगितलं. निवृत्ती घेतलेल्या खेळाडूंच्या लीजंड्स लीग क्रिकेट (LLC) ला पुढच्या वर्षी जानेवारी महिन्यात सुरुवात होणार आहे. रवी शास्त्री या लीगचे आयुक्त असतील. लीगचा पहिला मोसम जानेवारी महिन्यात आखाती देशांमध्ये होणार आहे. क्रिकेटशी जोडलं राहणं चांगलं वाटतं, खासकरून अशा दिग्गजांसोबत जे चॅम्पियन होते. ही लीग खूपच रोमांचक होणार आहे, असं शास्त्री प्रसिद्धी पत्रकात म्हणाले. या लीगमध्ये खेळणाऱ्या दिग्गज खेळाडूंना काहीही सिद्ध करण्याची गरज नाही, पण तरीही या लीगमध्ये त्यांची प्रतिष्ठा पणाला लागेल. ते कसे खेळतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल, अशी प्रतिक्रिया शास्त्रींनी दिली. या लीगचा भाग होणं रोमांचक आहे. या लीगचं भविष्य उज्ज्वल आहे, असं वक्तव्य शास्त्रींनी केलं. या लीगमध्ये भारत, पाकिस्तान, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू दिसतील.
  Published by:Shreyas
  First published: